शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजमान्यता नाही-‘संवेदना’ मेळाव्यात व्यक्त झाली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:25 AM

तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, मानवी हक्कांचे जतन करणारा आहे. त्यामुळे आता सर्व शासकीय, अशासकीय आणि खासगी व्यवस्थापनांत ‘लिंग’ या शब्दासमोर स्त्री / पुरुष याबरोबरच ‘इतर’ हा पर्याय लिहिणे बंधनकारक आहे; पण या निर्णयाची अंमलबजावणी केवळ दोन-तीन टक्के आहे. कायद्याची मान्यता मिळाली तरी अजूनही तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजमान्यता नाही आणि शासनाची मान्यताही नाही, अशी खंत ‘संवेदना’ मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे ‘संवेदना’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात रविवारी दुपारी हा मेळावा झाला. अनगोळ फौंडेशनच्या सचिव साधना झाडबुके म्हणाल्या, तृतीयपंथीयांमध्ये मातृत्वाची भावना दिसते; परंतु त्यांना कोणीही मूल दत्तक किंवा प्रतिपालकत्वासाठी देत नाहीत. कायद्यामध्ये तसा उल्लेख नाही. तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयूरी आळवेकर म्हणाल्या, शासनाच्या अनेक योजना केवळ स्त्री-पुरुषांसाठी असून, तेथेदेखील तृतीयपंथीयांचा विचार केला गेलेला नाही. सामाजिक न्यायाच्या अनेक योजना असल्या, तरी व सर्व दृष्टींनी तृतीयपंथी या योजनेस पात्र असले, तरी या तृतीयपंथीयांना अनुदान व पेन्शन मंजूर करताना त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये (स्त्री / पुरुष) घालायचे, हा प्रश्न अधिकाऱ्यांना असल्याने व ती संवेदनशीलता अधिकाऱ्यांत नसल्याने तृतीयपंथीय शासनाच्या सर्वच योजनांपासून वंचित राहतात. यासाठी शासनपातळीवर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

याप्रसंगी प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन, रोहिणी कांबळे, नवखुषी फौंडेशनच्या हुस्ना शेख यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवखुषी फौंडेशनच्या अध्यक्ष वैशाली देसाई यांनी फौंडेशनच्या वतीने साडी वाटप केले. याप्रसंगी आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव यांनी प्रास्ताविक केले.आत्मसहाय्य सामाजिक संस्थेचे सचिव अशोक पोतनीस यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य उपस्थित होते.ओळखपत्र द्या...तृतीयपंथीयांना शासनाने ओळखपत्र देऊन त्यांचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण, मतदान, निवडणूक हक्क, वारसा हक्क, पालकत्वाचा हक्क व मूल दत्तक घेण्याचा हक्क, आदी अधिकार देण्याबाबत मागणी करून याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली. कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे आयोजित संवेदना मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मयूरी आळवेकर. शेजारी वैशाली देसाई, मनीषा कापडे, साधना झाडबुके, प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर