राजघराण्यातील तिसऱ्या पिढीने केले गणरायाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:08+5:302021-09-11T04:25:08+5:30
कोल्हापूर : राजघराण्यातील श्री गणरायाचे शुक्रवारी न्यू पॅलेस येथे शाही लवाजम्यासह पालखीतून आगमन झाले. विद्यमान राजघराण्यातील तिसऱ्या पिढीने भक्तिमय ...

राजघराण्यातील तिसऱ्या पिढीने केले गणरायाचे स्वागत
कोल्हापूर : राजघराण्यातील श्री गणरायाचे शुक्रवारी न्यू पॅलेस येथे शाही लवाजम्यासह पालखीतून आगमन झाले. विद्यमान राजघराण्यातील तिसऱ्या पिढीने भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत केले. त्यानंतर प्राणप्रतिष्ठापणा, पूजा, आरती अशा धार्मिक कार्यात राजघराण्यातील महिला सदस्यांसह मानकऱ्यांनी उपस्थिती लावली.
न्यू पॅलेस येथे राजघराण्यातील सदस्यांतर्फे प्रतिवर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाही शुक्रवारी शाहूपुरी येथील कुंभार गल्लीतून शाही लवाजम्यासह वाजंत्र्यासह पालखीतून श्रींची मूर्ती मानकऱ्यांना आणली. पॅलेसवर श्रींची मूर्ती पोहचताच यौवराज शहाजीराजे छत्रपती, राजकुमार यशराजराजे छत्रपती यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत याज्ञसेनी छत्रपती महाराणी साहेब, श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी गणरायांचे औक्षण करून स्वागत केले.
राजपुरोहित बाळासाहेब दादर्णे, अमर जुगर, सारंग दादर्णे, विजय बंकर यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच पूजा केली. श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत तिसऱ्या पिढीतील सदस्य यौवराज शहाजीराजे व राजकुमार यशराजराजे यांनी गणरायाचे स्वागत केले.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-न्यू पॅलेस गणपती
ओळ - न्यू पॅलेस येथे शाही लवाजम्यासह विघ्नहर्त्या गणरायाचे पालखीतून आगमन होताच यौवराज शहाजीराजे व राजकुमार यशराजराजे यांनी स्वागत केले.
फोटो क्रमांक - १००९२०२१-कोल-न्यू पॅलेस गणपती०१
ओळ - कोल्हापूरातील न्यू पॅलेस येथे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर श्रीमंत याज्ञसेनी छत्रपती महाराणी साहेब, श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी दर्शन घेतले.