शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 15:37 IST

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देपन्हाळ्यावरून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन

पन्हाळा : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता किसान मोर्चा आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी पन्हाळा येथील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादकांचे दर्शन घेतले. 

किसान आत्मनिर्भर यात्रा काल पन्हाळा येथे मुक्कामी होती. आज सकाळी सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर पन्हाळाच्या पायथ्याशी असलेल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली.

पन्हाळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत,आ. गोपीचंद पडळकर यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत. महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचा सांगितलं.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या जनतेच्या शेतामध्ये पिकाच्या देठाला जरी हात लावल तर याद राखा. अश्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य उभे केले होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील जुनी व्यवस्था मोडित काढुन शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दलालांच्या जोखडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत, असे पडळकर म्हणाले.

गेली ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत, त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आ. पडळकर यांनी खंत व्यक्त केली.  म्हणाले, नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे. शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

यावेळी पन्हाळाच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचीन शिपुगडे आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकर