शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

चोरट्याने लिहिलं 'या बंगल्यातील लोक भिकारी', कोल्हापुरात या चोरीची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:42 IST

इतक्या मोठ्या बंगल्यात मोठा ऐवज मिळेल, अशी चोरट्यांना आशा होती. मात्र, त्याचा भ्रमनिरास झाला

कोल्हापूर : आर.के.नगरातील एक आलिशान बंगला चोरट्यांनी फोडला. यात ७ हजारांची रोकड व ३० हजारांचे दागिने चोरीस गेले. मोठ्या बंगल्यात किरकोळ ऐवज सापडल्याने चिडलेल्या चोरट्याने 'या बंगल्यातील लोक भिकारी आहेत,' असे खडूने भिंतीवर लिहून तो निघून गेला. या चोरीची परिसरात खुमासदार चर्चा सुरू आहे.

मुले नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहतात. त्यामुळे वृद्ध जोडपे आर. के. नगरात आलिशान बंगल्यात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते कागल तालुक्यातील आपल्या मूळ गावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने सर्वच खोल्यांतील कपाटे उचकटून साहित्य विस्कटले. यात चोरट्यांच्या हाती केवळ सात हजारांची रोकड व ३० हजारांचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लागला.

इतक्या मोठ्या बंगल्यात मोठा ऐवज मिळेल, अशी चोरट्यांना आशा होती. मात्र, त्याचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे चिडलेल्या चोरट्याने जाताना बंगल्याच्या भिंतीवर ‘या बंगल्यातील लोक भिकारी आहेत,' असे खडूने लिहिले. घर मालक आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी भिंतीवर लिहिलेला मजकूर पाहिला. तेव्हा त्यांना चोरट्यांच्या या कृतीवर हसावे की राग करावा, अशी भावना त्यांनी पोलिसांत तक्रार करताना व्यक्त केली. या चोरीपेक्षा भिंतीवर लिहून ठेवलेल्या मजकुराचीच चर्चा परिसरात अजून सुरूच आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी