रुग्णांचे दागिने लंपास करणा-या चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:32+5:302021-07-11T04:18:32+5:30
कोल्हापूर : राजारामपुरी तिसरी गल्लीतील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या महिलेचे ४५ हजारांचे सोन्याचे दागिने व मोबाईल हाताेहात लंपास करणा-या ...

रुग्णांचे दागिने लंपास करणा-या चोरट्यास अटक
कोल्हापूर : राजारामपुरी तिसरी गल्लीतील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या महिलेचे ४५ हजारांचे सोन्याचे दागिने व मोबाईल हाताेहात लंपास करणा-या चोरट्यास राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. संतोष नारायण जाधव (वय ३२, रा. वेताळ पेठ, ३री गल्ली, इचलकरंजी) असे चोरट्याचे नाव आहे, त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वंदना अरविंद पाटील (रा. पाटील गल्ली, शिंगणापूर, ता. करवीर) या ६ जुलै रोजी राजारामपुरी तिसरी गल्लीतील इंडोसरीन सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी गेल्या होत्या, त्या रिसेप्शन काऊंटरसमोर बाकड्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्याचा मोबाईल हॅंडसेट व ४० हजारांची आठ ग्रॅमची सोन्याची चेन, लहान बाळाचे कानातील सोन्याचे डूल असा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत त्यांनी शनिवारी चोरीचा गुन्हा नोंद केला. राजारामपुरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन चोरट्याचा पोलिसांना माग मिळाला, पोलिसांनी रात्री उशिरा या चोरीप्रकरणी संशयित संतोष जाधव या युवकास अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक जे. ए. पाटील करत आहेत.