जयसिंगपुरातील ते विद्युत पोल हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:14+5:302021-06-19T04:17:14+5:30
जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत पोल बाजूला काढण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. महावितरणकडून त्वरित कार्यवाही ...

जयसिंगपुरातील ते विद्युत पोल हटविले
जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत पोल बाजूला काढण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. महावितरणकडून त्वरित कार्यवाही सुरू करण्यात आल्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शाहूनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत पोलमुळे अपघाताच्या घटना घडत होत्या. हे पोल स्थलांतरित करण्यासाठी तसेच भूमिगत विद्युतपुरवठा करण्यासाठी ९ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला आहे, असे असताना महावितरणकडून या कामास दिरंगाई होत असल्यामुळे स्वाभिमानीच्यावतीने महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरण्यात आले होते. यावेळी अधिका-यांनी शुक्रवारपासून कामास सुरुवात करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हे काम सुरू झाल्यामुळे शहरवासियांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सागर मादनाईक, शैलेश आडके यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - १८०६२०२१-जेएवाय-११
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील शाहूनगरमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युल पोल काढण्यास महावितरणकडून शुक्रवारी सुरू करण्यात आले.