राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पूल होणार

By Admin | Updated: October 16, 2015 00:02 IST2015-10-15T23:46:44+5:302015-10-16T00:02:35+5:30

सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात : रत्नागिरी-कोकण मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निकालात निघणार

There will be a new bridge near the Rajaram Bunder | राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पूल होणार

राजाराम बंधाऱ्याजवळ नवीन पूल होणार

नवी दिल्ली : बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील एका शाखेतून कथितरीत्या काळा पैसा परदेशात पाठविण्याच्या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्यासाठी आणि या घोटाळ्यातील रकमेचा शोध लावण्यासाठी सीबीआयने जलद कारवाई करण्याची इच्छा वित्तमंत्रालयाने व्यक्त केली आहे.
वित्तमंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात ६ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, मात्र सीबीआयने त्वरेने तपास करावी, अशी आमची इच्छा आहे.
गेल्या आठवड्यात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दिल्लीतील अशोक विहार शाखेतून काजू, डाळी आणि तांदळाची खोटी आयात दाखवून त्यासाठी हाँगकाँग येथील फर्मला ६,१७२ कोटी रुपये काळा पैसा धाडण्यात आल्याचा आरोप आहे. या शाखेतील ५९ खात्यांत ही रोख रक्कम जमा करण्यात आली होती आणि आयातीसाठी ती जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या शाखेतून हाँगकाँगमधील निवडक कंपन्यांना हा पैसा पाठविण्यात आला.

Web Title: There will be a new bridge near the Rajaram Bunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.