शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमधील आगीची होणार चौकशी, आवश्यक अग्निरोधक यंत्रणेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 18:03 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुरुवातही केली.

ठळक मुद्देसीपीआरमधील आगीची होणार चौकशीआवश्यक अग्निरोधक यंत्रणेचा अभाव

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुरुवातही केली.सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमधील एका व्हेंटिलेटरने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना ओढावली खरी, परंतु तत्काळ सर्व यंत्रणांनी गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळली.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे तरीही त्याचे नेमके कारण शोधण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली.दुपारी या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने प्रत्यक्ष ट्रामा केअर सेंटरमध्ये जाऊन पाहणी तसेच चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला एका रुग्णाला लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमधून धूर यायला सुरुवात झाली आणि काही सेकंदात पेटही घेतला. रुग्णाच्या नाका-तोंडाला लावलेले पाईप या प्लास्टिकच्या असल्याने त्याने तत्काळ पेट घेतला व सर्व खोलीभर धूर झाला, असे अग्निशमन दलाने सांगितले. 

टॅग्स :fireआगCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर