शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हातकणंगलेत तिरंगी लढत होणार; राजू शेट्टी सोबत न आल्यास उमेदवार देणार, महाविकास आघाडीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 12:18 IST

आघाडीची ताकद असताना मागे का?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असा प्रयत्न आहे. पण, ते प्रतिसाद देत नाहीत. ते सोबत आले तर ठीक, अन्यथा आघाडीचा उमेदवार दिला जाणार असून त्यादृष्टीने तयारी लागा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये या मतदारसंघाबाबत रणनीती ठरवण्यात आली. राजू शेट्टी यांनी महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे व त्यांना हातकणंगलेची जागा सोडण्यास आघाडीत एकमत झाले आहे. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. शेट्टी यांना ताकद देण्याचा उद्धव ठाकरे यांचाच आग्रह आहे. पण, ते आघाडीसोबत येणार नसतील तर पाठिंबा का द्यायचा? असा प्रश्नही आघाडीत उपस्थित होत आहे.‘मी कोणासोबतही जाणार नाही, येथे उमेदवार उभा करायची की नाही? हे आघाडीनेच ठरवावे’ असे राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.ही जागा शिवसेनेला सुटल्याने येथून माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजीत मिणचेकर यांनी लढावे, असा आग्रह होत आहे. आघाडीने उमेदवार दिल्यानंतर तिन्ही पक्षाने ताकदीने मागे राहायचे असून, कोल्हापुरातील दोन्ही जागा मोठ्या फरकाने विजयी करायच्या आहेत, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, चंगेजखान पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, संजय चौगुले, ‘गोकुळ’चे संचालक अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, महेश चव्हाण, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, नितीन बागे आदी उपस्थित होते.आघाडीची ताकद असताना मागे का?‘हातकणंगले’ मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन आमदार, चार माजी आमदार आहेत. इतकी ताकद असताना आघाडी गप्प का? ताकदीने निवडणुकीला सामाेरे गेलो तर यश निश्चित असल्याचे या वेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी