शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागधारकांसह कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न ‘जैसे थे’, सहायक कामगार आयुक्तांकडूनही घोषणा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:01 IST

यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून ट्रेडिंगधारकांनी अजिबातच मजुरीवाढ दिली नाही.

अतुल आंबीइचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांना यंत्रमागधारकांकडून मजुरीवाढ मिळेना, तर यंत्रमागधारकांना ट्रेडिंगधारकांकडून मजुरीवाढ मिळेना, असे मजुरीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. त्यात दरवर्षी सहायक कामगार आयुक्तांकडून जाहीर केली जाणारी मजुरीवाढीची घोषणा यंदा जानेवारी महिना संपला तरी केली नाही.शहरातील वस्त्रोद्योगाची साखळी सुरळीत चालण्यासाठी सर्व घटकांमध्ये मजुरीची सुसूत्रता आवश्यक आहे. परंतु यामध्ये वारंवार तफावत निर्माण होते. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०१३ ला तत्कालीन कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन यंत्रमागधारकांनी कामगारांना दरवर्षी १ जानेवारीपासून मजुरीवाढ द्यावी. ही मजुरीवाढ वर्षातील महागाई भत्त्याचे मजुरीवर रुपांतर करून त्याची ५२ पिकांनुसार मजुरी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जाहीर व्हावी, असे ठरले होते. त्यानुसार सन २०१४ पासून ते २०२२ पर्यंत दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मजुरीवाढीची घोषणा केली जाते. यंदा महिना संपला तरी घोषणा झाली नाही. याबाबत शहरातील कामगार संघटनांनी निवेदन देऊन घोषणा करण्याची मागणी केली आहे.सन २०१६ नंतर व्यवसायातील अडचणी वाढल्याने सन २०१७ पासून ते सन २०२२ पर्यंत सहायक आयुक्तांकडून घोषित केलेल्या तक्त्यानुसार यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ दिली गेली नाही. महापूर, कोरोना अशा विविध कारणांमुळे कामगारांनीही मजुरीवाढीची मागणी केली नाही. मात्र आता मजुरीवाढीची मागणी होत आहे. परंतु यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून ट्रेडिंगधारकांनी अजिबातच मजुरीवाढ दिली नाही. परिणामी त्यांच्याकडून कामगारांना मजुरीवाढ देणे अवघड बनले आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी ट्रेडिंग असोसिएशनसोबत बैठका झाल्या, पण तोडगा निघाला नाही. म्हणून दोन्ही घटकांचा मजुरीवाढीचा प्रश्न जटील बनला आहे.यावर सहायक कामगार आयुक्त, लोकप्रतिनिधी व तिन्ही घटकांचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे मार्ग काढून या मजुरीवाढीच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढून पुन्हा सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे.

मजुरीची आकडेवारीसध्या यंत्रमाग कामगारांना ५२ पिकांला एक रुपये ८ पैसे ते एक रुपये १२ पैशांपर्यंत मजुरी दिली जात आहे. सहायक कामगार आयुक्तांच्या सन २०२२ च्या तक्त्यानुसार ही मजुरी एक रुपये ३२ पैसे पाहिजे. तसेच त्यामध्ये यावर्षीची किमान १३ ते १८ पैसे वाढ होते. कारण महापालिका झाल्याने परिमंडल (झोन) २ ऐवजी १ लागू झाला आहे. त्याचबरोबर यंत्रमागधारकांना ट्रेडिंग असोसिएशनकडून पाच रुपये ५० पैसे ते सहा रुपयांपर्यंतच मजुरी मिळत आहे. त्यात गेल्या दहा वर्षांपासून वाढ झाली नाही.अधिकाऱ्यांची टाळाटाळयाबाबत जाणून घेण्यासाठी येथील सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी तीन दिवस संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. कामगार हिताचा निर्णय होत नसल्याने कामगारातून त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षातील मंदी, महापूर व कोरोना अशा आपत्कालीन परिस्थितीत कामगारांनी मजुरीवाढीची अपेक्षा केली नाही. परंतु वाढलेल्या महागाईमुळे कामगारांना जगणे मुश्किल बनत असल्याने तत्काळ मजुरीवाढ द्यावी. - आनंदा गुरव, अध्यक्ष-जनरल लेबर युनियन 

ट्रेडिंगधारकांकडून खर्चीवाला यंत्रमागधारकांना गेल्या दहा वर्षांपासून मजुरीवाढ मिळाली नाही. त्यांच्याकडून मजुरीवाढ मिळाल्याशिवाय कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य आहे. त्यात व्यवसायाची परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून दिवसेंदिवस नाजूक बनत आहे. -  विकास चौगुले, अध्यक्ष-स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूर