जिल्ह्यात मृत्युदरात अजूनही घट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST2021-05-18T04:26:14+5:302021-05-18T04:26:14+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूच्या प्रमाणात अजूनही घट होत नसून, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नव्याने ५० जणांचा मृत्यू झाला ...

There is still no reduction in mortality in the district | जिल्ह्यात मृत्युदरात अजूनही घट नाही

जिल्ह्यात मृत्युदरात अजूनही घट नाही

कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूच्या प्रमाणात अजूनही घट होत नसून, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नव्याने ५० जणांचा मृत्यू झाला आहे. नवे १३७५ रुग्ण नोंदविण्यात आले असून, १०३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सर्वाधिक मृत्यू हे शिरोळ तालुक्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ५० किंवा त्याहून जास्त लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे व त्यात घट व्हायला तयार नाही ही जिल्ह्याचीच चिंता वाढविणारी बाब आहे.

जिल्हा प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत मृत्युदर कसा कमी करता येईल यावर भर दिला जात आहे; परंतु प्रत्यक्षात या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. त्याची कारणेही जुनीच आहेत. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ३८१ रुग्णांची नोंद असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यात १७०, हातकणंगले तालुक्यात १५५ आणि शिरोळ तालुक्यात १०३ नवे रुग्ण आढळले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वांत कमी तीन रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीमध्ये ९८ रुग्ण आढळले असून, अन्य जिल्ह्यांतील ६४ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौकट -

शिरोळमध्ये सर्वाधिक मृत्यू

शिरोळ ०८

तेरवाड, लाटवाडी, शिरढोण, यड्राव, दानोळी, चिंचवाड २, जयसिंगपूर

कोल्हापूर ०६

जवाहरनगर, पडळकर काॅलनी, राजेंद्रनगर, अयोध्या पार्क, टेंबलाईवाडी

कागल ०५

मुरगूड, निढोरी, सुळकूड, व्हन्नूर, मैाजे सांगाव

हातकणंगले ०५

हेरले, कोरोची, तारदाळ, हुपरी, खोतवाडी

करवीर ०५

निगवे, कुरुकली, कुडित्रे, उचगाव, आंबेवाडी

इचलकरंजी ०४

साळुंखे मळा, कृष्णानगर शहापूर, आंबेडकर नगर, म. गांधी हाैसिंग सोसायटी

पन्हाळा ०३

कुंभारवाडी, घरपण, पोर्ले तर्फ ठाणे

गडहिंग्लज ०२

भडगाव, बड्याचीवाडी

आजरा ०२

सुळे, आजरा

चंदगड ०२

कानूर, तुडये

शाहूवाडी ०१

सरूड

राधानगरी ०१

माळेवाडी सोळांकुर

भुदरगड ०१

अनप खुर्द

इतर जिल्हे

कौलव मिरज, राजेंद्रनगर हुबळी, बेडकीहाळ, सुभाषचंद्र नगर बेळगाव, सलीवाडी सावंतवाडी, महाद्वार रोड बेळगाव.

Web Title: There is still no reduction in mortality in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.