मुरगूडमध्ये सब स्टेशन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:31+5:302021-06-03T04:18:31+5:30
मुरगूड विभागाअंतर्गत एकूण १३ हजार ५९४ वीज ग्राहक आहेत. ५३ गावांचे कार्यक्षेत्र आहे तसेच मुरगूड शहराचा वाढता विस्तार लक्षात ...

मुरगूडमध्ये सब स्टेशन व्हावे
मुरगूड विभागाअंतर्गत एकूण १३ हजार ५९४ वीज ग्राहक आहेत. ५३ गावांचे कार्यक्षेत्र आहे तसेच मुरगूड शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता या ठिकाणी उच्चदाबाचे विद्युत जनित्र (३३/११ केव्ही) सबस्टेशन तत्काळ होण्याची गरज आहे.
सबस्टेशनकरिता आवश्यक असणारी जमीन मुरगूड नगरपालिकेने सन २०१९-२०च्या विकास आराखड्यामध्ये आरक्षित केलेली आहे. तेव्हा वीज महावितरण कंपनीने मुरगूडमध्ये ३३ केव्हीचे सबस्टेशन मंजूर करावे व त्याची उभारणी करावी, अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी कोल्हापूर विभागाचे वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना नुकतेच दिले. खासदार संजय मंडलिक यांनीही या संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केल्याचे नगराध्यक्ष जमादार यांनी सांगितले.