कोविड केअर साहित्यात गैरप्रकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:02+5:302021-04-30T04:30:02+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूर येथील कोविड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ...

There is nothing wrong with covid care literature | कोविड केअर साहित्यात गैरप्रकार नाही

कोविड केअर साहित्यात गैरप्रकार नाही

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूर येथील कोविड केअर सेंटरचे साहित्य बालिंगा येथील आरोग्य उपकेंद्रात ठेवण्यात आले होते. या साहित्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण करवीर पंचायत समितीच्या तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी दिले आहे.

गेल्या वर्षी कोरोना रुग्णांसाठी राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन, के. आय. डी. कॉलेज बॉईज होस्टेल गो. शिरगाव, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे येथे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले होते. डिसेंबरनंतर ते टप्प्याटप्याने बंद करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने कोविड केअर सेंटरचे साहित्य रिकामे करणे आवश्यक होते. या बंद सेंटरचे साहित्य करवीर तालुक्यातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याचा कोरोना रुग्णांसाठी वापर करण्यात येणार आहे.

--

Web Title: There is nothing wrong with covid care literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.