कुरुंदवाड पालिकेची कर वाढ नाही

By Admin | Updated: February 25, 2015 00:09 IST2015-02-24T22:38:18+5:302015-02-25T00:09:05+5:30

अंदाजपत्रक सादर : १२ विषयांना पालिका सभेत मंजुरी

There is no tax increase in Kurundwad Municipal Corporation | कुरुंदवाड पालिकेची कर वाढ नाही

कुरुंदवाड पालिकेची कर वाढ नाही

कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या सन २०१४-२०१५ च्या दुरुस्ती अंदाजपत्रकास व २०१५-२०१६ च्या चालू वर्षाची शिल्लक रक्कम चार कोटी ८६ लाख २३ हजार ७०० रुपये अंदाजपत्रकास कोणतीही कर वाढ केली नाही. यासह शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पालिका हद्दीतील आरक्षण क्रमांक ९, आठवडा बाजार व गवत मंडईच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम तसेच सामाजिक, आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण, २०११ अंतर्गत केलेल्या अंतरिम याद्यांना मान्यता, आदींसह १२ विषयांना मंगळवारी झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय खोत होते.
कुरुंदवाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला नगरसेविका मनीषा डांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील व कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. याला सभागृहाने मंजुरी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
पालिकेच्या सन २०१४-१५च्या दुरुस्त अंदाजपत्रकास मंजुरी देऊन चालू वर्षीच्या २०१५-१६ च्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये ३१ मार्च २०१६ अखेर ४ कोटी ८६ लाख २३ हजार ७०० रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर २०१४ चा पगार करण्यासाठी वेतन राखीव निधीतून रक्कम काढून पगार करणे, रस्ता अनुदानातून कोठावळे घर ते आप्पा भोसलेंच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, आरसीसी तसेच यू. सी. आर. गटर्स बांधण्यासाठी ४३ लाख ६१ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्रमांक ९, आठवडा बाजार व गवत मंडई ब्लॉक डी इमारतीवरील पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी २९ लाखांच्या बांधकामास मंजुरी यासह राजीव टायपिंग ते महाडिक घर रस्ता कॉँक्रीटीकरण, गुलाब चौगुले घर ते राजाराम भुई घर रस्ता कॉँक्रीटीकरण पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी विषयांना सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
यावेळी सभागृहात राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रामचंद्र डांगे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे, मनीषा डांगे, माधुरी सावगावे यांनी चर्चेत भाग घेतला. मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी उपनगराध्यक्ष वैभव उगळे, महिला बालकल्याण सभापती रजिया पठाण, नगरसेविका कमरून हुक्किरे, धोंडुबाई बागवान, शब्बीर बागवान, महादेव आंबी, पालिका निरीक्षक बजरंग ढेरे, नामदेव धातुंडे, अभियंता राजेंद्र कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)

शहर प्लास्टिक मुक्त होणार
आयत्यावेळच्या विषयामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रामचंद्र डांगे यांनी शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच ठराव झाला होता. त्या ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करून मुख्याधिकारी अतुल पाटील यांना धारेवर धरले. शहरातील सर्व मिळकतधारकांना कापडी पिशव्या देण्याचे मुख्याधिकारी यांना डांगे यांनी सूचविले. याकरिता आम्ही प्रभाग नुसार मदत करून प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी पालिका प्रशासनाने कारवाई करावी, असे डांगे यांनी सूचविले. त्यानुसार पाटील यांनी मोहीम हाती घेतली असून १ ते २ महिन्यांत शहर प्लास्टिक मुक्त होईल. असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: There is no tax increase in Kurundwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.