शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्ह्यातील १५ एप्रिलपासूनच्या १६५८ कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यातील १५ एप्रिलपासूनच्या १६५८ कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कंपनीला गुरुवारी रात्री उशिरा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १३ प्रयोगशाळांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून स्वॅबची तपासणी करण्यात येते. यामध्ये चार शासकीय, तर सात खासगी प्रयोगशाळा आहेत. पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कंपनीकडून कोल्हापुरात स्वॅबचे संकलन करून ते पुणे, मुंबईतून तपासून आणण्यात येतात. गेले वर्षभर या कंपनीकडून पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती नीट भरली जात होती. मात्र, या पंधरवड्यात मात्र त्यांनी १६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर केली नसल्याचे उघडकीस आले.

याची दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री तातडीने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली, तसेच या कंपनीकडून रुग्णांचे स्वॅब तपासणी करताना रुग्णांचा एसआरएफ आयडीदेखील तयार केला जात नाही. १५ एप्रिलपासून २६६० रुग्णांची स्वॅब तपासणी केली असता त्यातील केवळ १००२ रुग्णांचे अहवाल अपलोड केले आहेत.

उर्वरित रुग्णांचे अहवाल तातडीने न नोंदवल्यास साथ प्रतिबंधात्मक कायदा १८९७ चा भंग केल्यामुळे भारतीय दंडसंहिता अधिनियम १८६० कलम ४५ व कलम १८८ आणि नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ मधील नियमानुसार लॅबची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा मागविण्यात आला आहे.

चौकट

कमी आकडेवारीमुळे अडचणी

एखाद्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे, त्यांना ऑक्सिजनची किती गरज आहे यासह अनेक उपकरणे आणि अन्य वैद्यकीय साहित्याचा पुरवठा अवलंबून असतो. या रुग्णांची नोंदच नसल्याने त्याचा परिणाम या पुरवठ्यावर हाेऊ शकतो. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ही नोटीस काढल्याचे सांगण्यात आले.