मध्यावधीची शक्यता नाही : चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 14:05 IST2017-05-24T14:05:19+5:302017-05-24T14:05:19+5:30
खडसे यांचे ते वक्तव्य वैयक्तिक

मध्यावधीची शक्यता नाही : चंद्रकांतदादा पाटील
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील हे एकनाथ खडसे यांचे वैयक्तिक विश्लेषण आहे. राजय सरकार स्थिर असल्याने मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरात सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी खडसे यांच्या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली, असता त्यावेळी त्यांनी हे मत मांडले.
‘लवासा’बाबत माहिती नाही
‘लवासा’ प्रकल्पाचा विशेष दर्जा काढून घेतला याबाबत विचारणा करता याबाबत मला काहीही माहिती नाही. मी माहिती घेतो असे पाटील यांनी सांगितले.