शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत धुसफूस नाही, सर्व काही आलबेल - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 16:19 IST

सीएए आणि एनआरसीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत असल्याने तेच पुढील निर्णय घेतील, असे सांगून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी पुस्ती जोडली.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीमध्ये धुसफूस नाही, सर्व कांही आलबेल : जयंत पाटीलसीएए आणि एनआरसीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

कोल्हापूर : सीएए आणि एनआरसीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत असल्याने तेच पुढील निर्णय घेतील, असे सांगून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी पुस्ती जोडली. सीएए आणि भीमा कोरेगाव तपासावरुन महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.कोल्हापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी औपचारीक गप्पा मारताना मंत्री पाटील यांनी वरील वक्तव्य केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी राज्याचे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने तेच निर्णय घेणार आहेत.

भीमा-कोरेगावप्रकरणी राज्य सरकारकडून समांतर तपास सुरु असल्याबद्दल विचारले असता पाटील यांनी समांतर चौकशीचा निर्णय अजून कागदोपत्री झालेला नाही. झाला असेल तर त्याची मला कांही कल्पना नाही, असे सांगत यापासून अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. मतभेद तर अजिबात नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करत आहोत, असे स्पष्ट करुन पाटील यांनी सरकार भक्कम असल्याचाही निर्वाळा दिला. नवाब मलिक यांच्याबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर कुणी घोषणा दिली अथवा नाही दिली, यापेक्षा आमच्या पक्षाची भूमिका ठरली आहे, त्यात कधीही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkolhapurकोल्हापूर