शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी कोल्हापूर 'उत्तर'मधून मालोजीराजे रिंगणात उतरण्याची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:38 IST

मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाच तर ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात

कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर त्यांचे डिजिटल फलक झळकल्याने ‘कोल्हापूर उत्तर’मधून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने मालोजीराजे त्यास उपस्थित राहण्यासाठी सहकुटुंब बंगळुरूला गेले आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यास ते उपस्थित राहिले नाहीत.मालोजीराजे छत्रपती गेल्या काही महिन्यापासून सामाजिक कार्यात सहभागी झाले आहे. शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शाहू गोल्ड कप फुटबाॅल स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी क्रीडाप्रेमींशी जवळीक साधली. न्यू पॅलेसवरील त्यांच्या कार्यालयात कार्यकर्ते, नागरिकांना भेटत आहेत. जातीय दंगलीनंतर झालेल्या सदभावना यात्रेतही ते त्यांच्या समर्थकांसह सहभागी झाले होते. सोमवारी साजरा झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरभर डिजिटल फलकांवर मालोजीराजे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.शहरातील अनेक माजी नगरसेवक, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, फुटबॉल खेळाडू यांच्या वतीने सोमवारी सामाजिक उपक्रम राबविले. तसेच गेल्या काही महिन्यापासून मालोजीराजे यांचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मालोजीराजे विधानसभेची निवडणूक ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढविण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाच तर ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. कोल्हापूर उत्तरचे प्रतिनिधित्व सध्या जयश्री जाधव या करत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ‘कोल्हापूर उत्तर’ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत मालोजीराजे तगडे, ताकदवान उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला कोल्हापूर उत्तर ही जागा जाईल त्या पक्षाचे उमेदवार असू शकतात, अशीही एक शक्यता व्यक्त केली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण