शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती नाही; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती.. वाचा

By समीर देशपांडे | Updated: October 8, 2025 13:16 IST

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य स्थिती तपासण्यात आली

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आरोग्य स्थितीची गावपातळीवर नेमकी काय स्थिती आहे, याचे चित्र स्पष्ट होणे महत्त्वाचे असल्याने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य स्थिती तपासण्यात आली. आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या सादरीकरणातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचा वेध घेणारी विशेष मालिका आजपासून..समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८४ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती झाली नसल्याचे चित्र समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६८ पैकी ५१ केंद्रांमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यातील ८२ पैकी ३१ आणि सांगली जिल्ह्यातील ७० पैकी १८ केंद्रांमध्ये पाच महिन्यांत सरासरी एकही प्रसूती झालेली नाही.‘सार्वजनिक आरोग्य’च्या कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे केंद्र आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. परंतु, ही संख्या फारशी वाढत नसल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान १० प्रसूती व्हाव्यात, अशी शासनाची अपेक्षा आहे.ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करतात आणि ज्यांचा जनतेशी अतिशय चांगला संपर्क आहे, अशा ठिकाणी यापेक्षाही अधिक प्रसूती होत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी कारणे जरी वेगवेगळी असली, तरीही त्या ठिकाणी इतक्या मूलभूत सुविधा देवूनही प्रसूती होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यांतील ही सरासरी आकडेवारी आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे आणि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसुती झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर आणि संख प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चंदराई आणि धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हे प्रमाण खूपच कमी आहे.

चार जिल्ह्यांतील शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थेतील प्रसूतीची टक्केवारीजिल्हा  - शासकीय रुग्णालये - खासगी रुग्णालये

  • कोल्हापूर - ३९ - ७१                                    
  • सांगली - ३८ - ६२
  • रत्नागिरी - ३८ - ६२
  • सिंधुदुर्ग - ५७ - ४३
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Many primary health centers report zero deliveries, impacting healthcare.

Web Summary : Many Kolhapur division primary health centers report zero deliveries in five months. Kolhapur, Sangli, Ratnagiri, Sindhudurg districts show low delivery rates in government facilities. Private facilities handle more cases.