शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur news: लैंगिक छळ तक्रारीत तथ्य नाही, पन्हाळा पोलिस निरीक्षकांना क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:42 IST

पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याची महिला कर्मचाऱ्याने केली होती तक्रार

कोल्हापूर : पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांच्या विरोधात महिला कॉन्स्टेबलने केलेल्या तक्रार अर्जाची विशाखा समितीने चौकशी पूर्ण केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक काळे निर्दोष असून, चौकशी अहवाल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवल्याची माहिती विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.पोलिस निरीक्षक काळे यांनी असभ्य वर्तन करून पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याची गंभीर तक्रार महिला कॉन्स्टेबलने केली होती. १५ नोव्हेंबरला तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्वत: काळे यांची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी करण्याचे काम विशाखा समितीकडे सोपवले. विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, यांच्यासह दहा सदस्यांच्या समितीने तक्रारदार महिला कॉन्स्टेबल आणि काळे यांची स्वतंत्र चौकशी केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याची माहिती समोर आल्याचे अपर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले.

  • चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवला आहे. तक्रारदार महिलेने खोटा अर्ज का केला?, अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल संबंधित महिलेवर काय कारवाई होणार? याबाबत अधिक माहिती देण्यास विशाखा समितीच्या अध्यक्षांनी नकार दिला. 
  • तक्रारदार महिलेवरील कारवाईचा अधिकार पोलिस अधीक्षकांचा असून, योग्य वेळी ते उचित कारवाई करतील, असे अपर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले.

 

पोलिस निरीक्षकांबद्दल आलेल्या तक्रारीची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन विशाखा समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात आली. तक्रारदार महिला कॉन्स्टेबलच्या अर्जात तथ्य नसल्याचे दिसून आले. - जयश्री देसाई, अपर पोलिस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस