शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा, तुटपुंज्या तरतुदी; जलसिंचन योजनांना तरतुदी नाहीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:06 IST

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही

कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. बजेटमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील विकास प्रकल्प कागदावरच राहणार आहेत. यामुळे विकासाची गतीही मंदावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांना तरतुदी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, शहरातील व जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव निधी यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.सांगली, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांसाठीही काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी अर्थसंकल्पात दक्षिण महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे.

कोल्हापूरला हे मिळाले

  • जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी ५० कोटी
  • कोल्हापूर आणि गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी.
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टरची घोषणा
  • कोल्हापूर आणि ठाणे येथे अत्याधुनिक मनोरुग्णालयासाठी ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • चंदगड, आजरा येथे काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योग उभारणार

सांगलीला हे मिळाले

  • सांगली येथे नाट्यगृह बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद

साताऱ्याला हे मिळाले

  • सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामाला गती देणार
  • वाई येथील विश्वकोश इमारत बांधकामाला गती देणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा