शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

कोल्हापूर : कागल नगर परिषदेतील प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीत ३४२ मतदारांची नावे गायब, ८२२ नावे दुबार, ४५८ मयत मतदार नावे वगळली नाहीत, एकाच घरात अनेक नावे , काही बूथवर वाढ झालेल्या मतदारांची नोंद, प्रभाग क्रमांक ११ व ९ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवार दिलेले नाहीत, अशा अनेक गंभीर त्रुटी आहेत. तरी कामचुकार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवीन मतदार यादी प्रसिद्ध करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. याविषयी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.समरजीत घाटगे म्हणाले, प्रभागानुसार प्रसिद्ध मतदार यादीत प्रभाग क्रमांक दहामधील ३४२ मतदारांची नावे दिसत नाहीत. ती नावे इतर कोणत्याही प्रभागात दिसून येत नाहीत. शहरामध्ये २८ हजार ४१३ इतके मतदार आहेत. एक ते अकरा या प्रभागातील मतदार यादीत ८२२ नावे दुबार आहेत. सर्व प्रभागांमधील मयत ४५८ व्यक्तींची नावे वगळलेली नाहीत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये एकाच घरात तब्बल ३६ मतदारांची नोंद दिसते.प्रभाग क्रमांक ११ मध्ये ३ उमेदवार असून, २ हजार ३८८ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ९ हा दोन उमेदवारांचा असूनही मतदार संख्या ३७९२ इतकी आहे. प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी तफावत कशी? प्रभाग क्रमांक दोनच्या प्रारूप मतदार यादीत २४९५,२४९८,२५०० आणि २५०३ या चार अनुक्रमांकवर एकाच व्यक्तीचे नाव आहे. व्यक्ती एकच असून, मतदान ओळखपत्र वेगवेगळे आहेत. या चुका निवडणुकीपूर्वी दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी शाहूचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हुच्चे, माजी उपनगराध्यक्ष संजय कदम,आनंदा पसारे, मारुती मदारे, आप्पासाहेब भोसले, नंदकुमार माळकर, राजे बँकेचे संचालक रणजीत पाटील, अरुण गुरव, प्रवीण कुराडे, आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kagal Voter List Errors: Ghatge Demands Action Against Officials

Web Summary : Samarjeet Ghatge demands action over voter list errors in Kagal, including missing, duplicate, and deceased voters. He insists on a revised list before elections, threatening legal action if ignored. Serious discrepancies were highlighted.