शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन

By भीमगोंड देसाई | Updated: October 4, 2023 13:56 IST

डोकी शांत ठेवून २०२४ साली भाजपला हद्दपार करा

कोल्हापूर : भाजप देशात, राज्यात समाजा, समाजात व्देष, दुही निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेत आहे. गेल्या आठ महिन्यात राज्यात नऊ जातीय दंगली घडल्या. यामागे भाजप असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय स्वार्थासाठी भविष्यातही भाजपकडून जातीय दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मुस्लिम, दलित, ख्रिश्चन यासह सर्वच समाजांनी डोकी शांत ठेवून २०२४ साली भाजपला हद्दपार करावे, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी केले.मुस्लिम बोर्डिंगमध्ये मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तीसोबत चर्चा करताना ते बोलत होते. बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार जाधव म्हणाले, माझ्या गुहागर मतदारसंघात दोन वर्षापूर्वी भाजपकडून जातीय दंगलींना प्रोत्साहन दिले जाईल, असे भाकीत केले होते. ते आता तंतोतंत खरे ठरत आहे. यापुढील काळातही जातीय दंगली घडवून सत्ता मिळवण्याचा डाव भाजपकडून होणार आहे. सन २०२४ मधील निवडणूकही ते दंगली घडवून आणि जनतेची फसवणूक करून जिंकण्याची तयारी करीत आहे. यामुळे डोके शांत ठेवून हा त्यांचा डाव हाणून पाडत इंडिया आघाडीला निवडून आण्यासाठी सर्वच समाज घटकांनी पाठिंबा द्यावा.विकासाच्या बाबतील भाजप सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४, २०१९ मध्ये अनेक आश्वासन देवून सत्ता मिळवली. यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. प्रत्यक्षात कोणत्याही घटकात अच्छेदिन आलेले नाहीत. यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चौकाचौकात जावून जनतेशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपा