शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणसेवकांसाठी आनंदवार्ता!, मानधनात झाली भरघोस वाढ, भरती नसल्याने कोल्हापुरात लाभार्थी कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:42 IST

सरकारने २२ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला होता

पोपट पवार

कोल्हापूर : राज्यातील शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी अल्प मानधन मिळत असल्याने स्वत:च्या खर्चासाठीही त्यांना दुसऱ्यांकडून हातउसने पैसे घ्यावे लागत होते. आता मात्र सरकारने मानधनात अपेक्षित वाढ केल्याने स्वत:सह कुटुंबालाही हातभार लावता येणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणसेवकांकडून व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आमचा चरितार्थही चालेल आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या हालअपेष्टाही थांबतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने २००० साली शिक्षणसेवकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. तो कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना नियमित सेवेत घेऊन त्यांना पूर्ण वेतन दिले जाते.२०११ मध्ये केली होती वाढनियुक्त केलेल्या शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी तुटपुंजे मानधन होते. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविणेही त्यांच्यासाठी मुश्कील होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर २०११ मध्ये सरकारने काहीशी वाढ केली होती. मात्र, तेही मानधन समाधानकारक नव्हते. सध्या प्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षणसेवकांना आठ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर आता या मानधनात वाढ केली आहे.नव्या शिक्षणसेवकांना मिळणार लाभगेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षणसेवकांची भरती झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. लवकरच राज्यात ६७ हजार शिक्षणसेवकांची भरती केली जाणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या मानधनवाढीचा लाभ नव्या शिक्षणसेवकांना अधिक होणार आहे.आता किती मानधनवाढप्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपयांवरून १६ हजार रुपये मानधनवाढ करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणसेवकाचे मानधन आठ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात आले आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन नऊ हजार रुपयांवरून थेट २० हजार रुपये करण्यात आले आहे.डिसेंबरमध्ये घेतला होता निर्णयसरकारने २२ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला होता. त्याचा अध्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी काढण्यात आला.जिल्ह्यात किती जणांना होणार लाभप्राथमिक- ७माध्यमिक- ५५उच्च माध्यमिक- ०(गत महिन्यांत १०० हून अधिक जण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून कायम सेवेत गेले आहेत.)

सुरुवातीला तीन वर्षे अल्प मानधन असल्याने घरखर्चही भागत नव्हता. त्या तुलनेत सरकारने आता केलेली मानधनवाढ समाधानकारक आहे. - संतोष झिंत्रे - शिक्षणसेवक, केएमसी कॉलेज, कोल्हापूर 

मानधनवाढीचा निर्णय चांगला आहे. यामुळे शिक्षणसेवकांना निदान स्वत:चा खर्च तरी स्वत:च्या पैशातून करता येईल. महागाईच्या काळात ही वाढ कमी असली तरी पूर्वीच्या तुलनेत ती खूपच अधिक आहे. - अनिल माळगे, शिक्षणसेवक, भोगावती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक