आठ नगरपालिका कार्यक्षेत्रात एकही नवा रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:05+5:302021-09-09T04:31:05+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी येत असून, बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ ...

आठ नगरपालिका कार्यक्षेत्रात एकही नवा रुग्ण नाही
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी येत असून, बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात एकही नवा रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही. नव्या १०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरूंदवाड, कागल, हुपरी, पेठवडगाव, मलकापूर, मुरगूड या आठ नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही. तर आजरा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांतही एकही रुग्ण आढळलेला नाही. कोल्हापूर शहरामध्ये ३७, तर हातकणंगले तालु्क्यात २१ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
करवीर तालुक्यातील वडणगे येथील ७५ वर्षीय, तर शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे येथील ७० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचीही संख्या कमी करण्यात आली आहे.