सहा तालुक्यांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST2021-09-07T04:29:41+5:302021-09-07T04:29:41+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही. ११३ नागरिकांना नव्याने कोरोनाची ...

There are no new corona patients in six talukas | सहा तालुक्यांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही

सहा तालुक्यांत एकही नवा कोरोना रुग्ण नाही

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नोंदवण्यात आलेला नाही. ११३ नागरिकांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १३०० रुग्णांवर उपचार सुरू असून १५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आजरा, भुदरगड, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा या सहा तालुक्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही, हे दिलासादायक आहे. तर कुरूंदवाड, शिरोळ, हुपरी, मलकापूर, मुरगूड नगरपालिका क्षेत्रातही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोल्हापूर शहरामध्ये ३८, हातकणंगले तालुक्यात १३, करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी ११ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू पावलेले तीनही रुग्ण हातकणंगले तालुक्यातील आहेत. खोतवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, फरांदे मळा इचलकरंजी येथील ६५ वर्षीय महिला आणि कोरोची येथील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्व प्रकारच्या कोरोनाच्या सहा हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: There are no new corona patients in six talukas