शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

... तर अधिकाऱ्यांना कचऱ्यात बुडवू

By admin | Updated: September 28, 2016 00:37 IST

मनपा सभा : संतप्त नगरसेवकांचा इशारा; १५ आॅक्टोबरपर्यंत कचरा उचला; चालक द्या, कचरा उचलतो-अधिकाऱ्यांचे बेजबाबदार उत्तर

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात कचरा उठावाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. १५ आॅक्टोबरला मराठा मूक क्रांती मोर्चा असून, त्या दिवसापर्यंत कचरा उठाव झाला नाही तर अधिकाऱ्यांना कचऱ्याच्या कोंडाळ्यात बुडवू, असा रोखठोक इशारा महानगरपालिकेच्या सभेत मंगळवारी देण्यात आला. याचवेळी चालक द्या, कचरा उठाव करतो, असे बेजबाबदार उत्तर देणाऱ्या उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना सभागृहाने चांगलेच फैलावर घेतले. महापालिका सभेत प्रश्नोत्तरावेळी बहुसंख्य नगरसेवकांनी शहरातील कचरा उठावात होत असलेली दिरंगाई, नादुरुस्त कंटेनर, कमी असलेली आरसी वाहने, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यावर टीकेची झोड उठवत प्रशासनाला ‘सळो की पळो’ करून सोडले. शोभा कवाळे, जयश्री चव्हाण, पूजा नाईकनवरे, रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, माधुरी लाड, दीपा मगदूम यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. जयश्री चव्हाण यांनी नवीन आरसी वाहने येईपर्यंत कचरा उठाव करण्यासाठी काय पर्यायी व्यवस्था केली ते सांगा, असा आग्रह धरला. भागात फिरताना आम्हाला कचरा पाहून लाज वाटू लागलीय, असे त्या म्हणाल्या. जेसीबी नाही, कंटेनर नाही, पाण्याचे टँकर नाहीत, मग अधिकारी काय करतात, असा सवाल माधुरी लाड यांनी विचारला. प्रशासनावर आयुक्तांचा अंकुश राहिलेला नाही, म्हणून अधिकारी निष्क्रिय बनल्याचा आक्षेप पूजा नाईकनवरे यांनी नोंदविला. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. १५ आॅक्टोबरपूर्वी नवीन कंटेनर येणार आहेत. त्यानंतर कचरा उठाव नियमित होईल, असे त्यांना सांगितले; पण आता कचरा रस्त्यावर पडला आहे त्याचे काय? असे जयश्री चव्हाण यांनी त्यांना विचारले. त्यावेळी आरोग्य विभागाने खबरदारी घ्यायला पाहिजे, असे उत्तर अतिरिक्त आयुक्तांनी दिले. त्यामुळे नगरसेवक अधिकच संतापले. उपायुक्तांची उडविली खिल्ली सभागृहात नगरसेवक पोटतिडिकीने कचऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी चालक द्या, कचरा उचलतो, असे बेजबाबदार उत्तर दिल्यामुळे नगरसेवक अधिकच संतापले. शारंगधर देशमुख यांनी ‘माझ्यासह आणखी दोघांना ट्रक चालविता येतात, आम्ही चालक म्हणून येऊ का?’ अशी उद्विग्न शब्दांत विचारणा केली. जयंत पाटील यांनी वरिष्ठ अधिकारीच बेजबाबदार उत्तर देणार असतील आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याचे भान नसेल, तर त्यांना कचऱ्यातच उभे करावे लागेल, असा इशारा दिला. तर शारंगधर देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील चालक काढा आणि कचऱ्याच्या वाहनांवर टाका, अशी मागणी केली. मराठा मोर्चासाठी सज्ज रहा : महापौर १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रामाणे यांनी सभेत केले. मोर्चाच्या दिवशी शहरात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शहर स्वच्छ ठेवण्यात यावे, आवश्यक ती सर्व यंत्रणा प्रशासनाने तयार ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सेफ सिटी’चा अहवाल चुकीचाशहरात सेफ सिटी प्रकल्प राबविताना अनेक चुका, त्रुटी राहून गेल्या आहेत. तरीही त्रयस्थ संस्थेने केलेल्या लेखापरीक्षण अहवालात ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. ज्यांनी असा अहवाल दिला तो चुकीचा असल्याचा आक्षेप अजित ठाणेकर यांनी घेतला. मग अधिकारी काय करणार ? पाण्याचे टँकर मिळत नसल्याची तक्रार नगरसेविकांनी सभागृहात केली होती. त्याचा संदर्भ देत संभाजी जाधव यांनी पाच टँकर चालकासह भाजप-ताराराणी आघाडीतर्फे देण्यात येण्यात येतील, असे सांगताच महापौर अश्विनी रामाणे यांनी आपणच सगळे करायला लागलो, तर मग अधिकारी काय करणार, असा सवाल केला. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी तीन दिवसांत डंपर उपलब्ध करून देण्यात येतील आणि कचरा उठाव केला जाईल, असे सांगितले. खान-सूर्यवंशी खडाजंगी गोंधळ पाहून संतप्त झालेले नियाज खान यांनी पोटतिडिकीने भावना व्यक्त केल्या. वीस सभा झाल्या. एका तरी प्रश्नाची सोडवणूक झाली का, असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला. त्यावेळी विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक बदनाम होत आहेत. हद्दवाढ आपल्यामुळे रखडली, असे सांगताच सूर्यवंशी यांनी सभागृहाची शिस्त पाळा, असे म्हणताच तुमची शिस्त मगाशी बघितली, अशा शब्दांत नियाज खान यांनी उत्तर दिले. देशमुख-कदम जुंपलीसहा क्रमांकाचा विषय पुढील मिटिंगमध्ये घेण्यावरून शारंगधर देशमुख-सुनील कदम यांच्यात वादावादी झाली. देशमुख यांनी पुढील मिटिंगला विषय घ्या, असे महापौरांना सांगताच कदम यांनी कोणाच्या दादागिरीवर कामकाज चालणार नाही, असे सांगितले. त्यावर महापौरांनी कदम यांना सुनावत हे सभागृह सभ्य गृहस्थांचे असून, येथे दादागिरीची भाषा चालणार नाही, अशा शब्दांत सुनावले. पाणीपुरवठ्यावर दसऱ्यानंतर बैठक शहरातील पाणीपुरवठ्यावर सभेत अनेक तक्रारी करण्यात आल्या. अनेक भागांत पाणी मिळत नाही, अशी प्रामुख्याने तक्रार होती. त्यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी तुम्ही सभागृहानेच एक दिवस आड पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिले. नवरात्रौत्सव झाल्यानंतर एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे सभेत ठरले. निषेध व्यक्तसेफ सिटी प्रकल्पात घोटाळा झाला असताना त्याला प्रशासनाने ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी क ाळ्या फिती लावून सभेतभाग घेतला