शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोल्हापूरचे पाणी तोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:10 IST

कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले,

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचा इशारा पंचगंगा प्रदूषणप्रश्नी हरित लवादाने मागितले स्पष्टीकरणराष्ट्रीय हरित लवाद व पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दणका दिला

कोल्हापूर : शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असूनही प्रभावी उपाययोजना तातडीने केली नाही, याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय हरित लवादाने महानगरपालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले, तर नदीतील पाणी प्रदूषित करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवून पाणीपुरवठा खंडित करण्याचा, तसेच दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा इशारा दिला.

शहरातील ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असूनही तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यातून कोल्हापूर महानगरपालिकेचा निष्काळजीपणा समोर आल्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद व पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दणका दिला. याप्रकरणी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन सर्व यंत्रणांचे लक्ष वेधले होते.

पुणे येथील राष्टÑीय हरित लवादासमोर नदीच्या प्रदूषणाबाबत सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी ‘लोकमत’ची कात्रणे लवादासमोर सादर करून पंचगंगा प्रदूषणास महानगरपालिका कशी जबाबदार आहे, हे दाखवून दिले. लवादाचे न्यायाधीश यू. डी. साळवी व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नंदा यांनी या संदर्भात महानगरपालिकेने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश दिला. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होत असून, त्यावेळी हे स्पष्टीकरण देण्यात येईल, असे मनपाचे पर्यावरण अभियंता व्याघ्रांबरे यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांनी प्रदूषण नियंत्रणमंडळ, तसेच महानगरपालिकेला नोटीस दिली. कोल्हापूर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रियेशियाय थेट पंचगंगा नदीत सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगण्यात आले असून, महानगरपालिकेला दंडनीय दराने पाणीपट्टी आकारण्याचा, तसेच शहराचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.‘लोकमत’ इम्पॅक्टगेल्या पंचेचाळीस दिवसांपासून शहरातील सर्वच्या सर्व मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असूनही महानगरपालिका यंत्रणा सुस्त असल्याबद्दल ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकून हा गंभीर विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी महानगरपालिकेस नोटीस दिली.एवढेच नाही तर राष्टÑीय हरित लवादाने स्पष्टीकरण मागितले. तसेच पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. गेल्या ४५ दिवसांपासून निष्क्रिय वागणाºया मनपा प्रशासनास यामुळे चांगलाच दणका बसला आहे.प्रदूषणाचा अखेर पंचनामागेल्या पंचेचाळीस दिवसांपासून कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शुक्रवारी पंचगंगा नदीचा पंचनामा करण्यात आला. प्रांताधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीने जयंती, दुधाळी नाला, राजाराम बंधारा, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा चार ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंबंधीचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाईल. -वृत्त/हॅलो १प्रदूषणप्रश्नी अधिकारी धारेवरपंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. तुटलेली पाईपलाईन जोडून पूर्ववत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास का विलंब लावला जात आहे, अशी विचारणाही सदस्यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप नेजदार होते. -वृत्त/हॅलो ३

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण