...तर जिल्ह्यातील ‘संग्राम कक्षा’स टाळे
By Admin | Updated: November 25, 2014 00:31 IST2014-11-25T00:15:12+5:302014-11-25T00:31:10+5:30
परिचालक संघटनेचा मोर्चाने इशारा : पदाधिकाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे

...तर जिल्ह्यातील ‘संग्राम कक्षा’स टाळे
कोल्हापूर : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर्स)यांचे आंदोलन महाराष्ट्र राज्य सुरू आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना महाआॅनलाईन कंपनीने कामावरून कमी केले आहे. महाआॅनलाईन कंपनीने आठ दिवसांच्या आत जिल्ह्णातील व राज्यातील कामावरून कमी केलेल्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, अन्यथा जिल्ह्णातील सर्व पंचायत समितीमधील संग्राम कक्षांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. जोरदार निदर्शने केली.
महावीर गार्डनपासून संघटनेचे अध्यक्ष विशाल चिखलीकर, राज्य तांत्रिक सल्लागार दीपक पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाले. जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा केला तेथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांना देण्यात आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला. निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, डाटा आॅपरेटर्सना शासकीय सेवेत घ्यावे, मासिक वेतन १० हजार करावे आदी मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून डाटा आॅपरेटर्स ‘काम बंद’ आंदोलन करत आहेत. आंदोलनाची दखल शासकीय पातळीवर घेतली आहे. १८ नोव्हेंबरला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एक समिती नेमून कोणत्याही डाटा आॅपरेटर्सवर अन्याय होणार नाही, असा स्वरुपाचे आश्वासन दिले आहे.
बैठकीच्यावेळीच मागण्यांसंबंधी योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत संग्राम कक्षातील कामावर ‘डाटा आॅपरेटर्स’चा बहिष्कार कायम राहील, असे संघटनेच्या राज्याध्यक्षांनी सांगितले आहे, अशा घडामोडी सुरू असताना कंपनीने पदाधिकाऱ्यांनी कमी केले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने कामावरून कमी करण्याची कारवाई त्वरित मागे घ्यावी.
मोर्चात जिल्हा संघटक उमेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील देवेकर, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्यासह पदाधिकारी, जिल्ह्णातील डाटा आॅपरेटर्स सहभागी झाले होते.