‘शाहूपुरी’च्या हद्दीत दोन मोटारसायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:54+5:302021-07-03T04:15:54+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कंपनीच्या व स्टेशन रोडवरील एलआयसी ऑफीसच्या समोर उभ्या केलेल्या ...

‘शाहूपुरी’च्या हद्दीत दोन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कंपनीच्या व स्टेशन रोडवरील एलआयसी ऑफीसच्या समोर उभ्या केलेल्या मोटारसायकली चोरट्यांनी लांबविल्या. या दोन्ही चोरींची पोलिसांत नोंद झाली. याबाबतची फिर्याद नेताजी शंकर जाधव (वय ४५, रा. तांदुळवाडी, जि. सांगली) व संतोष शामराव पाटील (सोळांकूर, राधानगरी) यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी जाधव यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल महावितरण कार्यालयाच्या परिसरात २२ ते २९ जूनदरम्यान उभी केली होती. या दरम्यान अज्ञाताने ती चोरली. याबाबतची फिर्याद त्यांनी गुरुवारी शाहूपुरी पोलिसांत दिली. दुसऱ्या चोरीच्या घटना गुरुवारी स्टेशन रोडवरील एलआयसी कार्यालयाच्या समोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञाताने लांबविली. या चोरीचा तपास ठाणे अंमलदार घोलप व पाटील करीत आहेत.