गोडावूनमधून ६५ हजारांच्या बुटासह चप्पलांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:39+5:302021-06-21T04:16:39+5:30
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगरातील एका गोडावूनमधून ६५ हजार रुपयांचे बूट व चप्पल चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री ...

गोडावूनमधून ६५ हजारांच्या बुटासह चप्पलांची चोरी
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगरातील एका गोडावूनमधून ६५ हजार रुपयांचे बूट व चप्पल चोरट्याने लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी साडेनऊ या कालावधीत घडली. याबाबत नामदेव जायाप्पा बामणे (वय ४१, रा. तेजस्विनी काॅलनी, पाचगाव (ता. करवीर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी बामणे यांचे अभिनव एंटरप्रायझेस म्हणून बूट व चप्पलांचे गोडावून शिवाजी उद्यमनगरात आहे. हे गोडावून ते शुक्रवारी रात्री बंद करून गेले. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते आले असता, त्यांना एका नामांकित कंपनीचे ३० जोड बूट व २५ नग सॅण्डल आणि ४८ नग चप्पल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला आहे.