केर्लीत कॉंक्रीट वर्क कारखान्यात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:45+5:302021-05-16T04:21:45+5:30

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी ...

Theft at a concrete work factory in Kerala | केर्लीत कॉंक्रीट वर्क कारखान्यात चोरी

केर्लीत कॉंक्रीट वर्क कारखान्यात चोरी

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी साहित्य अज्ञाताने चोरून नेले. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत अमर दिनकर दाबाडे (वय ५८, रा. जुना बुधवार पेठ) यांनी शुक्रवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

अमर दाबाडे यांच्या मालकीचा केर्ली येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखाना आहे. या कारखान्यातील सिमेंट पाईप निर्माण करण्यासाठी लागणारा सहा एमएम जाडीचा तारेचा बंडल, चेन ब्लॉक, आर्थिंगची वायर असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने रविवारी (दि. ९) मध्यरात्रीच्या सुमारास चोरुन नेला. या चोरीबाबत दाबाडे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पो.नि. संदीप कोळेकर हे तपास करत आहेत.

Web Title: Theft at a concrete work factory in Kerala