शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा अपघाती मृत्यू झाला, आईचा जगण्याचा सूरच हरवला; अन् चक्क मुलानेच आईचा पुनर्विवाह घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:17 IST

युवराज शेले या तरुणाने विधवा आईच्या पुनर्विवाहाचे पाऊल उचलून कोल्हापूरचे पुरोगामीत्व अधिक घट्ट केले.

कोल्हापूर : सामाजिक सुधारणेत आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात तरुणाने आपल्या विधवा आईचा पुनर्विवाह घडविला. ४५ वर्षे वयाच्या आईची उर्वरित आयुष्यात पतीविना फरफट होऊ नये, या उदात्त हेतूने मुलानेच पुढाकार घेऊन घडवून आणलेला हा विवाह सध्या कोल्हापुरात चर्चेत आहे. या पुनर्विवाहाने कोल्हापूरच्या सामाजिक सुधारणांमध्ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले.युवराज नारायण शेले (वय २३) हा तरुण शिंगणापूर (ता. करवीर) येथील चंबुखडी परिसरात राहतो. त्याचे वडील सेंट्रिंग कामगार होते. गेल्यावर्षी रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यासाठी घरातून बाहेर गेलेल्या त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. त्या घटनेचा या कुटुंबावर मोठा आघात झाला. पतीच्या निधनानंतर युवराजची आई रत्नाबाईच्या जगण्याचा सूरच हरवला होता. बारावी शिकलेला युवराज आईला दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. कामाच्या निमित्ताने वारंवार घराबाहेर जाणाऱ्या युवराजला आईची चिंता वाटत होती. त्यातून त्याला आईच्या पुनर्विवाहाची कल्पना सुचली.चंबुखडी परिसरातच राहणारे नात्यातील घटस्फोटीत मारुती व्हटकर यांना युवराजने पुनर्विवाहाबद्दल विचारणा केली. त्यांनी होकार दर्शविताच युवराजने आपल्या आईकडे पुनर्विवाहाचा आग्रह धरला. सुरुवातीला आईने युवराजचे म्हणणे धुडकावून लागले. लोक काय म्हणतील, असे म्हणत तिने एकाकी आयुष्य काढू, असे सांगितले. मात्र, अखेर मुलाचा आग्रह मान्य करीत ती पुनर्विवाहासाठी तयार झाली. युवराजने पुढाकार घेऊन लग्नाची तयारी केली आणि चंबुखडी येथे १२ जानेवारीला लग्नाचा छोटेखानी समारंभ झाला. या लग्नाने रूढी-परंपरांची जळमटे हटवून समाजाला नवा संदेश दिला.विधवा प्रथाबंदीनंतरचे पुढचे पाऊलशिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने गेल्यावर्षी विधवा प्रथाबंदीचा ठराव केला. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी त्याचे अनुकरण करून विधवांना सन्मान देण्यास सुरुवात केली. आता युवराज शेले या तरुणाने विधवा आईच्या पुनर्विवाहाचे पाऊल उचलून कोल्हापूरचे पुरोगामीत्व अधिक घट्ट केले.

पत्नीचे निधन झाल्यानंतर पुरुष दुसरे लग्न करतात, तर मग पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने दुसरा विवाह करणे चुकीचे नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आईने उरलेले आयुष्य पांढऱ्या कपाळाने घालवणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मी तिच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेतला.- युवराज शेले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न