शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

Kolhapur: ‘पीएम किसान’मध्ये महसूलचाच खोडा; कृषी विभागाला लॉगिनची देईना

By राजाराम लोंढे | Updated: July 19, 2023 17:09 IST

शेतकऱ्यांशी तोंड देता कृषी अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस : ‘केवायसी’चे काम अंतिम टप्प्यात

राजाराम लोंढे कोल्हापूर : पंतप्रधान किसान योजनेचे काम आता कृषी विभागाला जरी दिले असले तरी महसूल विभागाने अद्याप त्यांना लाॅगिनच दिलेले नाही. केवळ कागदोपत्रीच कामाचे हस्तांतरण झाले आहे. सरकारचा हा प्रकार म्हणजे हात बांधून कामाची सक्ती केली असून स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देताना कृषी अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस आला आहे.केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. आता राज्य सरकारनेही सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील ९१ हजार ४७९ शेतकऱ्यांना पैसेच आले नाहीत. सरकारने कृषी विभागाला या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून ईकेवायसीसह इतर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक पातळीवर कृषी सहायकांचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३१ हजार ९१७ लाभार्थ्यांकडून ईकेवायसी पूर्ण करून घेतली आहे. अद्याप ५९ हजार ५६२ लाभार्थ्यांकडून पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यापैकी किमान ३० हजार पती-पत्नी दोघांनाही लाभ, मयत, बोगस नोंदणी किंवा संपर्क होत नाही, असेच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या महिन्याअखेर ईकेवायसी पूर्ण करायची असून त्यानंतरच चौदावा हप्ता येणार आहे.

दीड वर्षे झाले नवीन नोंदणीच ठप्पया योजनेत पात्र असलेले व ज्यांची नोंदणी झालेली नाही, असे शेतकरी गेली दीड वर्षे महसूल व कृषी विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारून थकले आहेत. हे काम महसूल की कृषी विभागाचे या भांडणात वर्ष गेले. आता कृषी विभागाकडे सोपवले; पण अद्याप अधिकारच दिला नसल्याने नवीन नोंदणी ठप्प झाली आहे.

दृष्टिक्षेपात पीएम किसान योजनेचे लाभार्थी -एकूण पात्र शेतकरी : ४,५९,७००ई केवायसी पूर्ण : ४,००,१३८अद्याप अपूर्ण : ५९,५६२

तालुकानिहाय ईकेवायसी पूर्तता अशी झालीतालुका - शेतकरी  - केवायसी पूर्णआजरा - २८,३४०  -  २४,५०३भुदरगड - ३०,३५४  -  २६,३९७चंदगड -  ३८,६६४  -   ३४,३९४गडहिंग्लज - ४७,३५०   -  ४१,५०२गगनबावडा  - ६,७४६  -  ५,९९२हातकणंगले -  ४७,८६४  -  ४०,१५९कागल -  ४३,१९५  -   ४०,१२५करवीर -  ५९,७५६   - ५१,६५२पन्हाळा -  ४५,१५०  -  ३८,७९९राधानगरी -  ३७,०२०  -  ३२,५४४शाहूवाडी -  ३१,६६८  -  २६,६४९शिरोळ -  ४३,५९३  -   ३७,४२२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी