शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Kolhapur News: पीएम किसान योजनेचे काम पाच महिन्यांपासून ठप्प; शेतकरी हेलपाटे मारून बेजार 

By विश्वास पाटील | Updated: March 11, 2023 12:58 IST

आधीच नीट मिळेना आणि नव्याची घोषणा

विश्वास पाटीलकोल्हापूर : कृषी की महसूल विभागाने यापुढे योजना राबवायची, या घोळात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे हेलपाटे मारून शेतकरी बेजार झाले आहेत. नवी नोंदणी पूर्णत: बंदच आहे. तोपर्यंत आता राज्य सरकारने गुरुवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच नीट मिळेना आणि नव्याची घोषणा, अशीच प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटली.ही मूळ योजना कृषी विभागाची. ती सुरू झाली २०१९ मध्ये. त्याचा शासन आदेशही कृषी विभागाचाच; परंतु त्यासाठी लागणारे कागदोपत्री पुरावे हे महसूल विभागाशी संबंधित. पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून योजना राबवण्याचा दबाव असल्याने महसूल खात्याने ही योजना राबवली. लॉगिन आयडी व पासवर्ड महसूल, कृषी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावावरच तयार झाले. परंतु पाच महिन्यांपूर्वी यापुढे ही योजना कुणी राबवायची यावरून वाद सुरू झाला. त्याचा निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये ज्या अर्जांची भूमिअभिलेख पडताळणी झाली नाही ती महसूल विभागाने पूर्ण करावी आणि मग ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचे तीन महिन्यांपूर्वी ठरले; परंतु अजूनही ३ लाख ६७ अर्जांची पडताळणीच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे योजनाही कृषी विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड तयार झालेले नाहीत. एखाद्या योजनेचा लाभ देताना शेतकऱ्यांची कशी अडवणूक होते याचीच ही योजना म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

नुसतीच टोलवाटोलवी...कृषी खाते म्हणते, लॉगिन आयडी अजूनही तालुकास्तरावर तहसीलदार व जिल्हा स्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नावे आहेत. त्यामुळे त्यांनी हे आयडी वापरून योजनेचे काम केले पाहिजेे परंतु महसूल खाते लोकांना कृषी खात्याकडे पिटाळत आहे. कृषी खात्याकडील तक्रार अर्जांचा गठ्ठा वाढत आहे. शासन स्तरावर याची दखल घेऊन यातून तोडगा निघण्याची गरज आहे.

सध्या खोळंबलेली कामे

  • नवीन नोंदणी, खात्यातील चुकांमुळे पैसे बंद
  • पात्र होतो; परंतु आता अपात्र झाल्याने हप्ता बंद
  • केवायसी केली, यादीत नाव आले; परंतु हप्ता आला नाही

दृष्टिक्षेपात पीएम किसान योजना

  • एकूण पात्र लाभार्थी : ९९ लाख
  • कागदपत्रांची पडताळणी झालेले : ९१ लाख
  • भूमिअभिलेख पडताळणी अपूर्ण - ३ लाख ६७ हजार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी