शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केसपेपर व औषधोपचाराच्या फाईलची चिंता मिटली, सरकारी रुग्णालयात एका क्लिकवर मिळणार रुग्णांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 13:18 IST

ही प्रणाली सुरु झाल्यावर केवळ एका टोकन नंबरवर संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे

दीपक जाधवकोल्हापूर : जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयातील कामकाज 'ई सुश्रुत ' प्रणाली ने ऑनलाइन होणार असून आता रुग्णाला केसपेपर व औषधोपचाराची फाईल जवळ बाळगावी लागणार नाही. हे कागदपत्र नसतानाही एका टोकन नंबर वरुन एक क्लिकवर त्या रुग्णांवर सरकारी रुग्णालयात यापूर्वी कोणते उपचार केले याची माहिती उपलब्ध होणार आहेत.या सेवेंतर्गत पहील्या टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने केसपेपर देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पहील्या टप्प्यात सेवा रुग्णालय,गाधी नगर वसाहत रुग्णालय,गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय व कोडोली अशा चार ठीकाणी ई सुश्रुत प्रणाली चालु करण्यात येणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे.सध्या या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने केसपेपर काढावा लागत आहे. ही प्रणाली सुरु झाल्यावर केवळ एका टोकन नंबर वर संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णाला कीवा नातेवाईकांना कोणतीही फाईल संभाळावी लागणार नाही. कोणती तपासणी करायची आहे त्या विभागात जाऊन फक्त आपला टोकन नंबर सांगताच रुग्णाला आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.बाह्यरुग्ण विभाग ते शस्त्रक्रिया विभागा पर्यंत सर्व विभाग हे ऑनलाईन झाल्याने रुग्णासह डाॅक्टराचाही वेळ वाचणार आहे. सध्या केसपेपर ऑनलाईन पद्धतीने होणार असून येणाऱ्या काही दिवसात सर्व शासकीय रुग्णालयात ही प्रणाली सुरु होणार असून त्याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे.

९० टक्के काम पूर्णजिल्हय़ातील चार रुग्णालयासाठी पहील्या टप्प्यात ऑनलाइन कामकाजासाठी ८५ संगणक व ३५ प्रिंटर मिळाले आहेत. ऑनलाइन कामकाजामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टरांचा वेळ वाचणार आहे. ऑनलाइनचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे.''

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वाचशासकीय रुग्णालयाचे पूर्ण कामकाज ऑनलाइन होणार असल्यामुळे केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांना भेटण्यापर्यंतचा वेळ हा संगणक प्रणाली मध्ये सेव्ह राहणार आहेत. शिवाय रुग्ण किती वाजता बाहेर पडला याची देखील माहिती या प्रणालीमध्ये राहणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना त्यांच्या कक्षामध्ये ठरलेल्या वेळे नुसार हजर राहणे बंधन कारक राहणार आहे.

ई सुश्रुत'प्रणाली मुळे शासकीय रुग्णालयातील कागदोपत्री होणारे कामकाज कमी होणार आहे. परिणामी रुग्ण रुग्णांच्या नातेवाईक व डॉक्टरांचाही वेळ वाचणार आहे. रुग्णाच्या आजार व उपचाराची माहिती समजू शकेल.'' - डॉ अनिल माळी. जिल्हा शल्य चिकित्सक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलonlineऑनलाइन