शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उन्हाचा तडाखा!, राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी फेब्रुवारीतच खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:31 IST

चार वर्षांनंतर हिप्परगीचे बॅकवॉटर नाही : यंदा पाण्याचे नियोजन करावे लागणार

संदीप बावचेजयसिंगपूर : यंदा कमी झालेला पाऊस आणि कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजजवळ कमी झालेली पाणीपातळी यामुळे शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर चार वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तयारी सुरु झाली आहे.हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे मार्च, एप्रिलपर्यंत राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्याची गरज भासत नव्हती. उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यातच कोयना धरणात देखील पाण्याचा कमी साठा आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णा नदीची पाणीपातळी वारंवार कमी होत आहे.राजापूर बंधारा जवळपासून ४० हून अधिक गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला आहे. पावसाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर पूरसदृश स्थिती निर्माण होते. पावसाची संततधार आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला की कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते. पाण्याचा विसर्ग सुरु झाला की शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरायला सुरुवात होते. मात्र कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे गेल्या चार वर्षापासून तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर बरग्याविना १३ फुटहून अधिक पाणी पातळी मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत पाहायला मिळत होती. त्यामुळे या बॅकवॉटरच्या परिस्थितीवरुन तज्ज्ञ समिती नेमून अभ्यासाची गरज असल्याची चर्चा झाली होती. राजापूरपासून ९० किलोमीटर असणाऱ्या हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा समतोल पहायला मिळत होता. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.बरगे घालणार..

  • मात्र गेल्या चार वर्षांनंतर कर्नाटकातील हिप्परगीचा बॅकवॉटर कमी झाल्यामुळे राजापूर बंधाऱ्यावर फेब्रुवारी महिन्यातच पाणीपातळी खालावली आहे.
  • शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने राजापूर बंधाऱ्यावर बरगे घालण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी