शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राक्षसांची युद्धे संपली, दंगली करतात माणसेच; भीमराव पांचाळे यांचे गझलमधून भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:04 IST

कोल्हापूर : माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे? असा सवाल उपस्थित करत गझलनवाज भीमराव ...

कोल्हापूर : माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे? असा सवाल उपस्थित करत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी कोल्हापुरात मंगळवारी (दि.१७) रात्री केशवराव भोसले नाट्यगृहात आपली शब्दसुरांची भावयात्रा रंगवली. राक्षसांशी राक्षसांची सर्व युद्धे संपली दंगली करतात आता माणसांशी माणसे अशी वेदना मांडत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.येथील प्रयोदी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पांचाळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. औपचारिक कार्यक्रमानंतर दोन तासाहून अधिक वेळ पांचाळे यांनी आपल्या सुरमयी गझलांनी रसिकांना डोलवले. डॉ. प्रवीण कोडोलीकर आणि योगिता कोडोलीकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो माेगरा असावा’ असे सांगतानाच‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठेपुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठेरोज अत्याचार होतो आरशावरती आताआरशाला भावलेली माणसे गेली कुठे’ असा अस्वस्थ करणारा प्रश्नही पांचाळे यांनी उपस्थित केला.

‘हे का कुणी फुलांना सांगायला हवे,त्यांनी कसे ऋतुंशी वागायला हवे’ अशा वास्तवाची जाणीव करून देतानाच पांचाळे यांनी‘हारण्यास एक नवा डाव पाहिजेसाकळे जुना नवीन घाव पाहिजे’ अशी संघर्षाची वृत्तीही आपल्या गझल गायनातून स्पष्ट केली. ‘जीवनाला दान’,‘ आसवांचे जरी हासे’,‘मज नको हे गगन’,‘तू नभातले तारे’,‘रोशनीचे कायदे’ या गझला सादर केल्या.‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अन् काळी कायमहागाईन पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय...रक्त लालच आहे सर्वांचे कशास मग ही भेदभावनासगळ्यांना मातीत जाणे कुणबी काय, माळी काय’असे विषण्ण वास्तव मांडल्याने नाट्यगृहातील रसिकही गंभीर झाले. तत्पूर्वी झालेल्या औपचारिका कार्यक्रमात ५१ वर्षे गझल सेवा करणाऱ्या पांचाळे यांचा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सरोज बिडकर उपस्थित होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर