शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सरवडेत जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या चल पादुकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 17:49 IST

Kolhapur: टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकाराम माउली ,राम कृष्ण हरीचा जयघोष..संताची विविध चलचित्रे ..अशा भक्तीमय वातावरणात राधानगरी तालुक्यातील सरवडे नगरी भक्तीमयरसात न्हाऊन निघाली होती.  

- दत्ता लोकरे  कोल्हापूर - टाळ मृदंगाचा गजर.. ज्ञानोबा तुकाराम माउली ,राम कृष्ण हरीचा जयघोष..संताची विविध चलचित्रे ..अशा भक्तीमय वातावरणात राधानगरी तालुक्यातील सरवडे नगरी भक्तीमयरसात न्हाऊन निघाली होती.  जगदगुरू संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यासाठी देहु हुन आणलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या चल पादुकांचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सकाळी ६ वाजता शिवाजीराव खोराटे विद्यालयाच्या प्रांगणात पादुकांचे आगमन झाले.शोभायात्रेने भव्य सोहळ्याची सुरुवात झाली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोतर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळयाला आजपासून  सुरुवात झाली. २७ जानेवारी पर्यंत हा सोहळा चालणार आहे. आज या सोहळ्याचा पहिला दिवस होता. त्यानिमित्ताने देहूतून  आणलेल्या संत तुकाराम महाराज चल पादुकांची  भव्य शोभायात्रेने सुरुवात झाली..या शोभायात्रेत जिल्ह्यातील अनेक गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

अनेक शाळेचे मुले विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आदींच्या वेशभूषेत  सहभागी झाली होती. महिलांच्या फुगड्या लक्षवेधक होत्या.  वारकर्याच्या टाळ मृदुंगाच्या गजरांनी सरवडे नगरी दुमदुमली होती.  उंदरवाडी ग्रामस्थांची  दिंडीतील घोड्यावरून आलेला  शिवाजी महाराजांच्या  चित्ररथाने  लक्षवेदी होता. तर हजारो महिलांच्या   डोक्यावरील कलश लक्ष वेधून घेत  होता..शशीकांत गुळवणी यांनी तयार केलेला बालचमुंचा चित्ररथ तर भारतप्रेमी,विठ्ठलाई तालिम,नवनाथ तरुण मंडळाचे लहानमुलांचे लेझीम पथक , मर्दानी दांडपट्टा  सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी  सरपंच रणधिरसिंह मोरे,पत्नी संयोगिता मोरे,शशीकांत गुळवणी,पत्नी मंगला गुळवणी, युवराज वाईंगडे,पत्नी गौरी वाईंगडे आदि दाम्पत्यांच्या हस्ते पादुकांचे विधीवत पुजन करण्यात आले आणि शोभायात्रा सुरु झाली दुपारपर्यंत हा दिव्य भव्य सोहळा साजरा झाला. कार्यक्रम स्थळी पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. आणि सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.उद्यापासून २७ जानेवारी पर्यंत या सोहळ्यात भजन ,प्रवचन, किर्तन असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत.यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष रोहित सावंत,कार्याध्यक्ष शिवाजीराव वागवेकर ,सर्व पदाधिकारी ,जिल्ह्यातील व सिमाभागातील  वारकरी ,महिला हजारो संख्येने उपस्थित होते.स्वच्छतेला विशेष महत्त्व या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांना विविध मंडळाच्या वतीने केळी,सरबत,ताक,बिर्याणी आदींचे वाटप करण्यात आले.यावेळी रस्त्यावर पडत असलेला कचरा शिवाजी तरूण  मंडळाकडून गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात होते. या स्वच्छतेबद्दल भाविकांकडून कौतुक होत  होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsant tukaramसंत तुकाराम