शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राजू, तू लोकसभेच्या कामाला जोर लाव, महादेवराव महाडिक यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 12:46 IST

कोल्हापूर : राजू तुझे काम कोणत्याही पक्ष व आघाडीपेक्षा वेगळे आहे. शेतकरी चळवळीसाठी तुझ्या कामाची गरज असल्याने तू कामाला ...

कोल्हापूर : राजू तुझे काम कोणत्याही पक्ष व आघाडीपेक्षा वेगळे आहे. शेतकरी चळवळीसाठी तुझ्या कामाची गरज असल्याने तू कामाला लाग असा सल्ला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला. या दोघांचीही अतिग्रे (ता.हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठात बुधवारी सकाळी काहीवेळ योगायोगाने भेट झाली. निमित्त होते संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे.शुभेच्छा देऊन बाहेर आल्यावर मान्यवरांसोबत घोडावत यांची चर्चा झाली. त्यानंतर पायऱ्या उतरत असताना नेहमीच्या स्टाइलमध्ये महाडिक यांनी शेट्टी यांच्या खांद्यावर हात टाकला आणि गर्दीतून थोडे बाजूला नेत आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा केली. महाडिक यांनी मला सातत्याने मदत केल्याची आठवण शेट्टी यांनी करून दिली. त्यावर महाडिक यांनीही मलाही राजू यांची वेळोवेळी व संकटाच्यावेळी मदत झाली आहे व ते मी विसरलेलो नाही असे सांगितले. हे दोघे बाजूला होऊन चर्चा करायला लागल्यावर तिथे गर्दी उसळली. लोकांची त्याबद्दल उत्सुकता ताणली होती. राजू, तब्येतीची काळजी घ्या, वजन कमी करा, व्यायामाकडे लक्ष द्या असाही प्रेमाचा सल्ला महाडिक यांनी शेट्टी यांना दिला. त्यावर संजय घोडावत मिश्कीलपणे म्हणाले, महाडिक म्हणजे देवानंद आहेत. आजही त्यांची प्रकृती खणखणीत आहे. सुमारे आठ ते दहा मिनिटेच ही चर्चा झाली. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगामी लोकसभा निवडणूकीत शेट्टी यांची भूमिका एकला चलो रे अशी आहे. या मतदार संघात महाडिक यांची ताकद आहे. या भेटीमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची दिशा काय राहील याचेच संकेत मिळाल्याची चर्चा सुरू झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिक