शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला आवडतो कोल्हापुरी गूळ.. टॅरिफमुळे होणार निर्यातीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:35 IST

अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ होतो निर्यात

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील गुळाला जगभरातील अनेक देशांची मागणी आहे. कोल्हापूरच्या गुळाला सर्वाधिक मागणी असणाऱ्या अमेरिकेने आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्याने अमेरिकेत कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा काहीसा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.कोल्हापूरच्या गुळाची चव इतर राज्यातील, देशांमधील गुळापेक्षा वेगळी असल्याने येथील गुळाला मोठी मागणी आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी दीड लाख किलो गूळ निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकत ५०० क्विंटलपेक्षा अधिक गूळ निर्यात होतो. येथे गुळाला पूर्वीपासून शंभर टक्के आयात शुल्क आकारले जाते.मात्र, डोनाल्ड ट्रम्प सरकारने यावरही अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेत कोल्हापुरी गूळ महाग होणार आहे. आयात शुल्कामुळे महाग झालेल्या कोल्हापुरी गुळाची मागणी घटण्याची भीती कोल्हापुरातील गूळ व्यापाऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे हे अतिरिक्त आयात शुल्क रद्द करावे, अशी मागणी या व्यापाऱ्यांमधून होत आहे.

कोल्हापूरसाठी अमेरिका का महत्त्वाची?प्रत्येक वर्षी गूळ हंगामात दीड लाख किलोपेक्षा जास्त गूळ परदेशात निर्यात केला जातो. यापैकी एकट्या अमेरिकेत ५०० क्विंटलपेक्षा जास्त तो निर्यात केला जातो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ही मागणी वाढत आहे. त्यामुळे गुळाच्या बाबतीत अमेरिका हा देश कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, या २५ टक्के अतिरिक्त शुल्कामुळे गुळाची मागणी घटण्याची भीती आहे.

कोल्हापुरातून ५० हजार किलाेपेक्षा जास्त गूळ अमेरिकेत निर्यात केला जातो. तेथे यापूर्वी गुळावर शंभर टक्के आयात शुल्क होतेच. पण, आता त्यावरही २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावल्याने गूळ महाग होऊन मागणी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अतिरिक्त आयात शुल्क रद्द करावे. - निमिष वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर