शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

Kolhapur- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:39 IST

देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळा

संदीप आडनाईककोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात पहिल्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा होतो. देवीची उत्सवमूर्ती रोज रात्री साडेनऊ वाजता पालखीत विराजमान होते, मग चोपदाराची ललकारी होताच ही पालखी नगर प्रदक्षिणेस निघते. ज्या ज्या मार्गावरून पालखी जाते, त्या त्या मार्गावर पालखीपुढे सेवेकऱ्यांकडून पायघड्या घातल्या जातात. जवळपास शंभराहून अधिक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळाम्हणजेच नगर प्रदक्षिणा सोहळा. पंचमीच्या दिवशी कोल्हासुराचा संहार झाल्यानंतर सर्व व्यवस्थित आहे, घाबरू नका हे सांगण्यासाठी देवी करवीरच्या सर्व भाविकांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडते. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडपात तुळजाभवानी देवीची भेट, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वारमार्गे पुन्हा मंदिर या जुन्या वाटेवरून देवी प्रदक्षिणा घालते. ९ दिवस रोज देवीच्या पालखीसमोर पायघड्या घालण्याचा मान पूर्वी परीट गल्लीतील मानकऱ्यांकडे होता. आता यात सारे भाविक सहभागी झाले आहेत.पायघड्यांसाठी पांढरे शुभ्र कापडप्रदक्षिणेच्या मार्गावर घातल्या जाणाऱ्या या पायघड्यांसाठी ११ मीटरचे मांजरपाटाचे कापड लागते. गेल्या अनेक पिढ्या या पायघड्या घालण्यासाठी राजू मेवेकरी यांच्याकडे वारसाने हा मान आहे. श्री महालक्ष्मी भक्त मंडळाकडे ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद अशा १० ते १२ पायघड्या आहेत. ॲड. तन्मय मेवेकरी, सुनील खडके, धनंजय वाठारकर, प्रशांत जोशी, वसंत वाठारकर, संजय फलटणकर, ऋतुराज सरनोबत, आदित्य मेवेकरी यांच्यासह १८ वर्षापासून ६० वर्षांपर्यंतचे शंभरावर भाविक ही सेवा देतात.

ललिता पंचमीला परतताना पायघड्यामंदिर प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणेचा मार्ग वगळता वर्षातून फक्त एकदाच ललिता पंचमीला अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिराचा परीघ सोडून भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी टेंबलाईला भेटण्यासाठी बाहेर पडते. परतताना टेंबलाई, टाकाळा, शाहू मिल चौक, उमा टॉकीज, बिंदू चौक, जुना राजवाडामार्गे अंबाबाई मंदिरापर्यंत पालखीसमोर सेवेकरी १० ते १२ किलोमीटर पायघड्या घालतात. पांढऱ्या रंगाचे ११ मीटरचे एक याप्रमाणे २५ मांजरपाटाच्या पायघड्या सेवेकऱ्यांकडे आहेत. प्रत्येक सेवेकऱ्याला श्रीपूजकांमार्फत श्रीफळ देउन सन्मानित केले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Devotees uphold tradition of laying paths before Ambabai goddess.

Web Summary : For over a century, devotees in Kolhapur have laid white cloth paths before Goddess Ambabai's palanquin during Navratri. This tradition, now embraced by many, involves volunteers providing and laying the paths during processions.