शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Kolhapur: साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील; वाघापुरात कृष्णात डोणे यांची भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 14:12 IST

'आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील'

बाजीराव जठार वाघापूर : साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील, देशात मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, दुष्काळ पडंल अशी भाकणूक कृष्णात डोणे यांनी वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य केली.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य रात्री भाकणूककार कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी भाकणूक केली. त्यांच्या भाकणुकीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक, गोषवारा पुढीलप्रमाणे : वाघापूर हे गाव, त्याचं दूरवर नाव हाय, वेदगंगेच्या काठी बाभळीच्या बनात माझी वस्ती हाय ,वाघापूर गावचा महिमा वाढत जाईल, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा बाळानों राज्य गा करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील, देशात गा मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, पडंल पडंल बाळांनो दुष्काळ पडंल.नदीबाईला कुलपं पडतील,  मानकऱ्यांची विटंबना करशील तर थोबाडीत खाशीला, मेघाची कावड गैरहंगामी हाय, मेघाच्या पोटी आजार हाय, पाऊसपाणी पीक यांचं कालमान बदलत चाललंय, कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकंल, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व  दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही, चालता बोलता मनुष्याला मरण येईल, माझं माझं म्हणू नका,माणसाला माणूस खाऊन टाकील, येतील येतील लाकडाची डोरली येतील,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल,येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल,नदीकाठावरील जमीन ओसाड पडंल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, होईल होईल भूकंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल, ज्योतिर्लिंगाची करशीला  सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.यावेळी भाकणुकीस ज्योतिर्लिंग देवालयाचे पुजारी दत्ता गुरव, जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष, सरपंच बापूसाहेब आरडे, समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सर्व नवरात्रकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर