शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील बिंदू चौकात भरधाव कारचा थरार, सात दुचाकींना ठोकरले; दाम्पत्यासह तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:34 IST

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भवानी मंडप ते बिंदू चौक मार्गावर सबजेलजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कारने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दाम्पत्यासह सात दुचाकींना ठोकरले. या अपघातात महिलेसह तिघे जण जखमी झाले. राजेश श्रीपती तोरस्कर (वय ४८), राणी राजेश तोरस्कर (४२, रा. रविवारपेठ, कोल्हापूर) यांच्यासह एक मुलगाही यामध्ये जखमी झाला. जखमीमध्ये राजेश तोरस्कर यांना गंभीर इजा झाली आहे. कारने उडवल्याने दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या घटनेत काही दुकानांसह स्टॉलचीही मोडतोड झाली. जखमी मुलाचे नाव समजू शकले नाही.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे येथील काही भाविक कारने आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेऊन अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते. देवीचे दर्शन झाल्यावर कार भवानी मंडपातून बिंदू चौकाकडे जात होती. सबजेलपासून काही अंतरावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. भरधाव असलेल्या कारने चालत जात असलेल्या तोरस्कर दाम्पत्याला जोरात धडक दिली. त्यात राणी तोरस्कर रस्त्याच्या बाजूला फेकल्या. पती राजेश गाडीखाली पडले. यावेळी लहान मुलालाही इजा झाली.कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या कापड, चप्पल विक्री दुकान, स्टॉलधारक, दुचाकी वाहनांना उडविले. अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरातील व्यापारी, स्टॉलधारकांसह भाविकांची धांदल उडाली. अनेक जणांनी भीतीने पळापळ केली. मोटारीखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या राजेश तोरस्कर यांना सीपीआरमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मोटार चालक सतीश नायडू (वय ७५, रा. पुणे) यांना जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.बघ्याची गर्दीमध्यवर्ती व गजबजलेल्या रस्त्यावर दुर्घटना घडल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहने इतरत्र पडल्याने रात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली. सहायक निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात