कोल्हापूर : ग्रोबज कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूकप्रकरणी शुक्रवारच्या सुनावणीत तत्कालीन तपास अधिकारी आणि त्यावेळचे जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह इतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
न्यायालयाची परवानगी घेऊन पंडित हे सुनावणीला ‘व्हीसी’वरून दाखल झाले होते. यावेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनाही सोमवार (दि. २२) पर्यंत तपासाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात स्वतः हजर राहून सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.जादा परताव्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह शेजारच्या जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना ग्रोबझ कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधीचा गंडा घातला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग केला होता. कंपनीचा मुख्य संचालक विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात विसंगती असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी सुनावणीत निदर्शनास आणून दिले. तपासात विसंगती असल्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेतली आहे. म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीत तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख पंडित यांच्यासह इतर तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. सुनावणीस गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.
Web Summary : Ex-SP Shailesh Balkawade must appear in court regarding the Grobaze fraud case. Investors were duped by the company's directors. The court noted inconsistencies in the investigation.
Web Summary : ग्रोबज़ धोखाधड़ी मामले में पूर्व एसपी शैलेश बलकवडे को अदालत में पेश होने का आदेश दिया गया है। कंपनी के निदेशकों ने निवेशकों को धोखा दिया। अदालत ने जांच में विसंगतियां पाईं।