शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आदर्श पोटनियम पतसंस्थांच्या मुळावर येणार; अटी कोणत्या, काय होणार परिणाम.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:33 IST

नवीन शाखा हवी, तर आयुक्तांकडे अर्ज करा

कोल्हापूर : ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्थांसाठी शासनाने आदर्श पोटनियम आणला असून, यातील अटी विशेषता ग्रामीण भागातील पतसंस्थांच्या मुळावर येणार हे निश्चित आहे. कामकाजामध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न यामागे असला, तरी प्रत्यक्ष कायदा आणि व्यवहार याची सांगड घालूनच कर्ज वितरण करावे लागते.आडल्यानडलेल्यांना सावकारी फासातून बाहेर काढण्यासाठी ग्रामीण व नागरी भागात पतसंस्थांची स्थापना करण्यात आली. गरजूंना कमी व्याज दराने कर्ज मिळण्याचे ठिकाण म्हणून पतसंस्थांकडे पाहिले जाते. कर्जदाराची बाजारातील पत आणि त्याच्यावरील विश्वास पाहून विनातारण अंगावर एक लाखापर्यंत कर्ज देणाऱ्या पतसंस्था आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात सावकारीचे प्रमाण तुलनेत कमी आहे. पण, शासनाने आदर्श पोटनियमाच्या आडून पतसंस्थांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग सभासदालाच कर्ज पुरवठा करायचा, ‘ब’ वर्ग सभासदाला कर्ज वितरण करू नये, असे स्पष्ट म्हटले आहे. कर्जासाठी सगळ्यांनाच सभासद करून घ्यायचे म्हटले, तर विनाकारण राजकारण होऊन संस्थेचे नुकसान होऊ शकते. कामकाजात हस्तक्षेप वाढू शकतो, त्यातून अनेक वेळा काम करणे अवघड होते.

अंशदानाने संस्था आतबट्यात 

  • शासनाने पतसंस्थांना अंशदान देणे बंधनकारक केले आहे. पतसंस्थांना त्यांच्या नफ्यातून ५ टक्के अंशदान द्यावे लागणार आहे. 
  • मुळात वित्तीय संस्थांमध्ये कमालीची स्पर्धा पहावयास मिळत आहे. त्यातून कर्ज वितरण करून त्याची वसुली करणे हे संस्थांपुढे आव्हान आहे. कमी मार्जिनवर व्यवसाय करावा लागत असल्याने पतसंस्थांचा नफा कमी झाला आहे. त्यातून ५ टक्के द्यायचे म्हटले, तर संस्था आतबट्यात येण्यास वेळ लागणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • कार्यक्षेत्र वाढवणे व नवीन शाखा काढण्यासाठी आता आयुक्तांकडे परवानगी मागावी लागणार आहे.

शासनाने पतसंस्थांबाबत लागू केलेल्या आदर्श पोटनियमाला राज्यातून विरोध होत आहे. मुळात संस्था चालवणे अवघड झाले असताना अंशदान कोठून द्यायचे? कर्ज वितरणाबाबतही लावलेले निकष चुकीचे आहेत. वास्तविक पोटनियम बदलताना राज्य फेडरेशनला विश्वासात घेणे अपेक्षित होते. - अनिल पाटील (कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन)