शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दत्त दालमिया कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 23:13 IST

Kolhapur News: दत्त (दालमिया भारत शुगर) या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामास बुधवारी (दि.२६) सुरूवात केली. परंतू ही उचल मान्य नसलेच्या निषेधार्थ पन्हाळा तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची ऊस वाहतुक रोखली.

- सरदार चौगुले आसुर्ले   पोर्ले -  विविध संघटनेच्या मागणीनुसार आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामास बुधवारी (दि.२६) सुरूवात केली. परंतू ही उचल मान्य नसलेच्या निषेधार्थ पन्हाळा तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची ऊस वाहतुक रोखली. कारखाना गेटसमोर ऊसाने भरून आलेल्या ट्रॅक्टर चालकांच्या अंगावर धावून जात कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर परत पाठवले. पहिल्या उचलीबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणीही ऊस तोड घेऊ नये असे आवाहन संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना करण्यात आले.

दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिले उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिले होते.आज बुधवारी सकाळी दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत असताना, अपेक्षेप्रमाणे दालमियाने पहिली उचल जाहिर न केल्याच्या निषेधार्थ  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना गेट समोर अडवले आणि त्यांना परतीचा मार्ग दाखवला. काही कार्यकर्त्यांनी तर त्याचं ट्रॅालीतील ऊसाचा बुडका उपसून चालकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

शासनाच्या यावर्षीचा रिक्वरीचा बेस धरून दालमिया प्रशासन पहिली उचल देत असेल तर ती आम्हाला अमान्य आहे.त्यांना गत हंगामातील दोन्ही एफआरपीचा सुवर्ण मध्य साधून पहिली उचल जाहिर करावी.जोपर्यंत स्वाभीमानी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्या एफआरपीबाबत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी तोडणी स्वीकारू नये असे तालुका युवा अध्यक्ष विक्रम पाटील यांनी कारखानास्थळी केले.

यावेळी तालुका अध्यक्ष रामराव चेचर, दगडू गुरवळ, उमेश शेलार, बाबूराव शेवडे, शिवाजी शिंदे, नारायण पाटील, रणजीत पानारी, दिपक लोकरे, बाळू कोठावळे, महादेव झेंडे (पडळ), विक्रम पाटील (वाघवे) नाथाजी पाटील (चव्हाणवाडी) आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने