शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:39 IST

गडहिंग्लज : डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणी प्रकाश गोरुले ...

गडहिंग्लज : डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय १७, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, भडगाव येथील प्रकाश गोरुले हे सरंबळवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी श्रावणी हीदेखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. २०१९ पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते. १ जानेवारीला सीटीस्कॅन व एमआरआय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झालेली नव्हती.मानसोपचारतज्ज्ञाकडूनही उपचार केले; परंतु त्यांच्या औषधोपचारानेही काही फरक न पडल्यामुळे चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यातून उपचार सुरू होते. डोकेदुखीच्या त्रासामुळे ती निराश व अबोल असायची.दरम्यान, सोमवारी सकाळी वडील शाळेला आणि आई भांडी धुण्याकरिता घराच्या पाठीमागे गेली असताना तिने साडेअकराच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. वडील प्रकाश गोरुले यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर