शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात 

By राजाराम लोंढे | Updated: April 24, 2024 13:49 IST

तालुकानिहाय उमेदवार..जाणून घ्या

राजाराम लोंढेकोल्हापूर : पराभूत होणार हे माहिती असूनही २५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची जोखीम पत्करण्यामागे राजकीय जोडण्या दडलेल्या असतात. अपक्षांच्या आडून मतविभाजन करून दिग्गजांचे विजयी गणित बिघडविण्याची रणनीती खेळली जात आहे. या निवडणुकीत ‘कोल्हापूर’मधून विविध पक्षांचे ९, तर १४ अपक्ष व ‘हातकणंगले’मधून विविध पक्षांचे १२ आणि १५ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षही रिंगणात असतात. अपक्ष रिंगणात उतरविणे, हा राजकीय डावपेचाचा भाग असतो. ग्रामपंचायत निवडणुकीत गल्ली, भावकीत बंडखोरी करायला लावून विजय सोपा करण्याची रणनीती आखली जाते. विधानसभा निवडणुकीत आपणाला मतदान न होणाऱ्या विभागात अपक्षाला रसद पुरवून रिंगणात उतरवले जाते. लोकसभा निवडणुकीतही कोणता तालुका आपणाला पोषक नाही, याची चाचपणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच केली जाते.‘कोल्हापूर’ मतदारसंघात नऊ तालुके व कोल्हापूर शहर येते. यामध्ये राधानगरी, गगनबावडा तालुकेवगळता सर्वच ठिकाणचे उमेदवार आहेत. करवीर तालुक्यातील सर्वाधिक आठ, तर कोल्हापूर शहरातील ७ उमेदवार रिंगणात आहेत.‘हातकणंगले’मध्ये सहा तालुके व इचलकरंजी शहर येते. येथे इचलकरंजी शहरवगळता सर्व तालुक्यातील उमेदवार आहेत. हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक ९, जण तर मतदारसंघात नसलेल्या करवीर तालुक्यातील दोन उमेदवार आहेत. एकूणच अपक्षांची संख्या आणि त्यामागील राजकीय डावपेच पाहिले तर दिग्गजांचे गणित बिघडविणार हे निश्चित आहे.जातीय समीकरण‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांसह रिंगणात असलेले उमेदवार विविध जातींचे आहेत. मतविभाजनातील प्रमुख कारणांपैकी हे एक असून, त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

आजऱ्यात लाखभर मते अन तीन उमेदवारजिल्ह्यात गगनबावड्यानंतर आजरा तालुका छोटा आहे. जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ तेही तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. जेमतेम लाखभर मते, पण तेथून लोकसभेचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.‘माने’ आडनावाचे चौघे रिंगणातउध्दवसेनेचे सत्यजित पाटील - सरुडकर व पारगावचे सत्यजित पाटील हे अपक्ष असे नावात साधर्म्य असणारे उमेदवार ‘हातकणंगले’त आहेत. त्याचबरोबर ‘माने’ हे आडनाव असलेले चौघेजण आहेत. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील अरविंद माने हे दोन्ही मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

तालुकानिहाय उमेदवार असे कोल्हापूर :आजरा -३, चंदगड-१, भुदरगड-१, गडहिंग्लज -१, कागल-१, पन्हाळा -१, करवीर-८, कोल्हापूर शहर-७

हातकणंगले :शिराळा - २, वाळवा - ५, शाहूवाडी - २, पन्हाळा - ३, शिरोळ - ४, हातकणंगले - ९, करवीर-२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४