शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गव्यांचा मुक्काम वाढला; चारा, पाण्यामुळे पाय निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:35 IST

गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच

कोल्हापूर : रमणमळा परिसरातील शेतात असलेले मुबलक गवत आणि पाण्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहरात असलेला गव्यांचा मुक्काम वाढला असून त्यांचा पाय परतीच्या वाटेने निघेना. रविवारी हे गवे शहरात मुख्य वस्तीत येऊ नयेत यासाठी वनविभागाकडून शिकस्त होत आहे.जयंती नाला परिसर ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेताकडे जाणाऱ्या वाटा वनविभागाने सुरक्षेसाठी बंद केल्या आहेत. या परिरसरात सहा गव्यांचा कळप मुक्कामी आहे. पंचगंगा नदीकाठावरच्या गवताची त्यांना भुरळ पडली आहे. येथील शेतकऱ्यांनी रविवारीही यातील काही गवे दिसल्याचा दावा केला आहे.या गव्यांचा रमणमळा परिसरात वावर कायम राहिल्याने वनविभागाने आपली गस्तही कायम ठेवली आहे. आठजणांच्या संयुक्त रेस्क्यू टीमने दिवसभर गस्त घातली. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून पथकातील वनकर्मचाऱ्यांनी हे गवे शहरात येऊ नयेत, यासाठी मिरच्यांच्या धुरी आणि शेकोटी पेटवून ठेवली. हे गवे अजूनही पंचगंगा नदीपात्रात वडणगेच्या मार्गावरच आहेत.पूर्ण वाढ झालेल्या या गव्यांचा कळप परिसरातील उसातच मुक्काम ठोकून आहे. करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रात्रपाळीत गस्त घालत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग